27 August 2014

सुधारस/केळी पाक(Sudharas)

No comments :
सुधारस हे एक सोपे व पट्कन होणारे असे पारंपारिक पक्वान्न आहे. पूर्वी लग्न संमारंभात आदले दिवशीचा म्हणजे सीमांतपूजनादिवशीचा मेनू हमखास सुधारसच ठरलेला असयचा. असा हा सुधारस कसा बनवायचा ते पाहू. साहीत्य व कृती, 

साहीत्य:-
* पिकलेली केळी ४ नग
* साखर १ वाटी ,पाणी गरजेनुसार
* वेलची पूङ
* लिंबू रस पाव पाव टीस्पून

कृती:-
प्रथम केळाच्या गोल चकत्या कापून घ्याव्यात .

नंतर दुसर्या भांङ्यामध्ये साखर बुङेल इतपत पाणी घालावे व भांङे गॅसवर ठेवावे साखर विरघळून एक उकळी आली की, त्यामध्ये कापलेल्या केळीच्या चकत्या घालाव्यात व  एक उकळी आणून गॅस बंद करावा. 

भांडे खाली उतरवून लिंबूरस वेलचीपूङ घालावी. सुधारस तयार. 

हा पूरी अथवा पोळी बरोबर खाणयास छान लागतो व झटपट तयार होतो .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment