20 April 2017

कोकोनट-बनाना लड्डू (Coconut -Banana Laddu )

No comments :

बरेचवेळा घरात केळी आणली जातात. परंतु ती घट्ट व पांढराशुभ्र असेपर्यंत म्हणजे पहिले एखाद-दोन दिवस खातात सर्वजण, व नंतर ती मऊ, काळी झाली की कोणी हात लावायला तयार होत नाही. मग त्याची शिकरण कर.. सुधारस कर असे करावे लागते. नाहीतर वाया जातात. तसेच आपण कुठे बाहेर देवाला गेलो किंवा आणखी कांही इतर कारणानी घरात ओले खोबरे (नारळ)  जमा होते. अशावेळी असे केळ व खोबरं घालून त्याचे छोटे-छोटे लाडू करून ठेवावेत. ४ -८ दिवस सहज टिकतात व मुलांना किंवा कोणी धरी आल्यावर खायला देण्यास सोयीचे होते. कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ओलं खवलेलं खोबरं  ४ वाट्या
* पिकलेली मऊ लहान केळी ४
* साखर ४ वाट्या
* मिल्क पावडर २ टेस्पून
* डेसिकेटेड कोकोनट अर्धाी वाटी
* वेलचीपूङ
* काजू ऐच्छिक

कृती :-
प्रथम एका जाड बुडाच्या कढईमधे ओलं खोबरं व साखर एकत्र  करून गँसवर ठेवावे.

नंतर साखर विरघळून मिश्रण चटचटायला लागले केळी मँश करून घालावी. सतत हलवत रहावे. तळाला लागू देऊ नये.

आता साधारण दहा मिनिटानी मिश्रण घट्ट व्हायला लागले की वेलचीपूड, मिल्कपावङर व काजू बारीक तुकडे करून घालावे. मिश्रण व्यवस्थित घोटावे.

आता मिश्रण बाजूने कोरडे व्हायला लागेल व गोळा कढईपासून सुटा व्हायला लागेल. लगेच गँस बंद करावा.

नंतर मिश्रण किंचित कोमट होऊ द्यावे व पटापट् लहान -लहान गोळे बनवावेत व डेसिकेटेड कोकोनट मधे घोळवावेत.

थंड झाले की खायला द्यावेत. या लाडूला खुप मस्त केळाचा स्वाद येतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment