"कैरी भात" ही दक्षिण भारताची खासियत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कच्या कैर्या येतात. या गुणधर्माने थंड असतात. त्यामुळेच उन्हाळ्याचे दिवसात कैरीचे पन्हे, सरबत, आंबेडाळ, कायरस असे अजून कितीतरी पदार्थ बनविले जातात.अशापैकीच हा "कैरीभात " हा करायला अतिशय सोपा आहे व चविष्ट लागतो. कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तांदुळ २ वाट्या
* कैरी मध्यम १
* चणाडाळ १ टीस्पून
* उडीद डाळ १ टीस्पून
* शेंगदाणे १ टेस्पून
* सुक्या २ लाल मिरचीचे तुकडे
* कढीपत्ता
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर
* हिंग, मोहरी, हळद फोडणीसाठी
* तेल २ टेस्पून
कृती :-
प्रथम तांदुळचा मोकळा भात शिजवून घ्यावा व गार होण्यासाठी ताटात पसरून ठेवावा.
आता कैरी किसून घ्यावी. नंतर कढईत तेल गरम करून फोडणी करावी. फोडणी तडतडली की,चणाडाळ, उडीद डाळ व शेंगदाणे घालून तांबूस परतावे. परतत आले की हळद, मिरची, कढीपत्ता घालावा. बाकी मसाले, मीठ सर्व आताच घालून परतावे. शेवटी कैरीचा किस घालून मऊ होईपरेंत परतावा. गँस बंद करावा.
आता तयार मसाल्यामधे गार भात घालून व्यवस्थित एकजीव करावे. हा भात गारच खातात. त्यामुळे वाफ आणण्याची आवश्यकता नाही.
कच्या कैरीच्या चविचा थोडा आंबट,मसालेदार भात अत्यंत उत्कृष्ट लागतो. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment