कचोरी ही सामान्यपणे उत्तर भारतीयांची खासियत. वरून मैद्याचे आवरण (पुरी) व आत बटाटा, वाटाण्याचे सारण असते. पण मी थोडा बदल केलाय. मैदा टाळण्यासाठी हा प्रयोग केला व छान जमले. टिपिकल कचोरी पेक्षाही वरचे आवरण खुसखूषीत होते.व भाज्याही पोटात जातात. कसे केले साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
सारणासाठी --
* कोबी किसान/बारीक चिरून 2 वाट्या
* मटार 1वाटी
* शिमला मिर्च बारीक चिरून 1
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट 2टीस्पून
* कोथंबिर चिरून
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* चाट मसाला पाव टीस्पून
* साखर चिमूटभर
* मीठ चविनूसार
* हळद.,हींग मोहरी
* तेल 1टेस्पून
वरच्या पारीसाठी
* उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे 2-3
* जाड पोहे भाजून 2वाट्या
* मीठ चविला
कृती :-
प्रथम बटाटे सोलून जाड खिसणाीने किसून घ्या. त्यामधे पोहे भाजून घाला. चविला मीठ घाला व एकत्र मळून घ्या. बाजूला ठेवून द्या.
आता सारणासाठी पँन मधे तेल गरम करा. हळद, हींग, मोहरी घालून फोडणी करा. त्यामधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घाला. नंतर कोबी, शिमला, मटार घाला. थोडे परतून घ्या. नंतर मीठ,गरम मसाला, धना-जीरा पावडर, साखर, चाट मसाला घालून एक वाफ आणून घ्या. फार मऊ शिजवू नका. क्रंची पणा राहू दे. शेवटी वरून कोथंबिर घालून हलवा.
आता आधि करून ठेवलेल्या कणिकेचा मोठ्या लिंबाइतका गोळा घ्या व वाटीचा आकार करून तयार सारण भरा. अलगद हाताने तोंड बंद करून एकसारखा गोळा करा. अशा सर्व कचेार्या करून घ्या.
गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तांबूस रंगावर तळा.
गरमा-गरमच खायला द्या. आवडत असेल तर हिरवी चटणी, साँस द्या. पण नुसत्याही छान लागतात. पोह्यामुळे खूप खुसखूषीत होतात. तूम्हीही करून बंघा. नक्की आवडतील.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.