दिवाळी झाली की, फराळाचे तेच तेच पदार्थ खाऊन सगळ्याना कंटाळा आलेला असतो. त्यामुळे डब्यामध्ये थोडे-थोडे चिवडा,शेव तसेच पडते व नवीन झणझणीत काहीतरी खावे वाटते.तेव्हा मस्त कोल्हापूरी झणझणीत मिसळ-पाव पूढील पध्दतीने करावे.म्हणजे डबे पण मोकळे होतात व घरची मंडळी पण खुष!
साहित्य:-
कटाचे साहित्य -
* तिळ १ टेस्पून
* खसखस १ टेस्पून
* किसून सुके खोबरे २ टेस्पून
* लवंगा चार-पाच
* दालचिनी दोन इंच
* मिरे पाच-सहा
* जिरे एक टीस्पून
* मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून
* लसूण ८-१० पकळ्या
* खसखस १ टेस्पून
* किसून सुके खोबरे २ टेस्पून
* लवंगा चार-पाच
* दालचिनी दोन इंच
* मिरे पाच-सहा
* जिरे एक टीस्पून
* मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून
* लसूण ८-१० पकळ्या
* हिरवी मिरची
* आले एक इंच
* तेल १०० मि.लि
* लाल मिरची पावडर आवडीनुसार
* हळद पावडर
* मीठ चवीनुसार
* आले एक इंच
* तेल १०० मि.लि
* लाल मिरची पावडर आवडीनुसार
* हळद पावडर
* मीठ चवीनुसार
इतर साहित्य;-
* मीठ घालून वाफवलेली मोडाची मटकी व उकडलेले बटाटे पाव किलो
* फरसाण
* बारीक चिरलेला कांदा
* लिंबू चिरून
* लादी पाव किंवा सॅडविच स्लाइज्ड ब्रेड
* वरून घालण्यासाठी ओले खोवलेले खोबरे व चिरलेली कोथिंबिर
* मीठ घालून वाफवलेली मोडाची मटकी व उकडलेले बटाटे पाव किलो
* फरसाण
* बारीक चिरलेला कांदा
* लिंबू चिरून
* लादी पाव किंवा सॅडविच स्लाइज्ड ब्रेड
* वरून घालण्यासाठी ओले खोवलेले खोबरे व चिरलेली कोथिंबिर
कृती
कट
प्रथम एका पॅनमध्ये तिळ,खसखस,खोबरे कोरडेच भाजावे.नंतर थोड्या तेलावर कांदा भाजावा.
प्रथम एका पॅनमध्ये तिळ,खसखस,खोबरे कोरडेच भाजावे.नंतर थोड्या तेलावर कांदा भाजावा.
आता हे कटाचे भाजलेले साहीत्य व वर दिल्यापैकी राहीलेले मसाल्याचे साहीत्य सर्व एकत्र वाटून त्याचे चांगले वाटण तयार करून घ्यावे .वाटताना गरजेनूसार थोडे-
डे पाणी घाला.
नंतर जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवून तेल घालावे.तेल गरम झाले की त्यात आधि थोडा चिरलेला कांदा टाकावा व नंतर तयार वाटण घालावे व तेल सूटेपर्यंत भाजावे.भाजत आल्यावर लाल मिरचीपावडर,हळद घालावी व थोडे परतावे.शेवटी अंदाजे एक ते दीड लिटर पाणी घालावे व मीठ टाकून पाच मिनीट ऊकळू द्यावे.
कटानंतरची कृती
आता सर्व्हींग प्लेट घेऊन त्यामध्ये आधि वाफविलेली मटकी थोडी,उकडलेला बटाटा चार फोडी मग फरसाण अशा क्रमाने थर घालून शेवटी गरमा-गरम उकळता तयार कट दोन डाव घालावा.
आता तयार डीश वर वरून खोबरे कोथिंबिर,कच्चा कांदा घालून लिंबूची फोड ठेवावी व पावाबरोबर झणझणीत मिसळ सर्व्ह करावी.
टीप्स:-
१) जास्त तेलकट कट नको असेल तर तेल थोडे कमी घ्यावे.आवडीनूसार कमी-जास्त करावे.
२) मटकीची उसळ करून घेतली तरी चालते.परंतू तयार कटामधे मटकी घालू नये.कटाचा स्वाद चव बदलते. तसेच नुसता कट असेल तर दोन दीवस आरामात छान टिकू शकतो.
३) फरसाणच्या जोडीला डब्यात शिल्लक असेल तर शेव चिवडा पण घ्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
मिसळ पाव
भाजलेले मसाला साहित्य
तेलात परतलेला मसाला
तयार कट
त
तयार मिसळीचे साहित्य
No comments :
Post a Comment