अनारसे हा पदार्थ थोडी दीर्घ कृती असल्याने व गोड असल्याने दिवाळी व्यतिरीक्त एरव्ही सहसा केला जात नाही. तसेच अनारसे जाळीदार असल्याने अधिक मासामधे जावयाला वाण म्हणून द्यायची पण पध्दत आहे.तेव्हाही केले जातात. पण कितीही वेळखाऊ पदार्थ असला तरी दिवाळीला फराळाच्या ताटाला अनारसे असल्याशिवाय शोभा नाही. तर असे हे नाजुक अनारसे कसे करायचे साहित्य व कृती,
साहित्य :-
* पटणीचा जाड, जुना तांदुळ १/२ किलो
* स्वच्छ, पिवळा गुळ १/२ किलो
* साजुक तूप १-२ टेस्पून
* वेलची, जायफळ पावडर आवडीनुसार
* खसखस १०० ग्रँम
* पिकलेले केळ १ (ऐच्छीक)
* तूप तळणीसाठी
* साजुक तूप १-२ टेस्पून
* वेलची, जायफळ पावडर आवडीनुसार
* खसखस १०० ग्रँम
* पिकलेले केळ १ (ऐच्छीक)
* तूप तळणीसाठी
कृती:-
प्रथम तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत.पाणी रोज बदलावे.अन्यथा तांदळाला कुजकट वास येऊ शकतो.
तिसर्या दिवशी पाणी निथळून, सुती कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पीठ चाळावे व बारीक पीठी करावी.
नंतर गुळ किसणीने किसून किंवा बारीक कुटून घ्यावा व चाळलेल्या पिठाीमधे मिसळावा. साजुक तूपाचे मोहन व वेलदोडे, जायफळची पूड घालून हलक्या हाताने मळून गोळा तयार करावा .
आता हा तयार पीठाचा गोळा प्लास्टिक किंवा अल्युमिनिअम च्या डब्यात घालून ७ ते ८ दिवस मुरण्यासाठी ठेवावे. पीठ चांगले मुरले तर अनारशाला जाळी पडते व अनारसे जाळीदार, कुरकूरीत होतात.
नंतर जेव्हा अनारसे करायचे असतील तेव्हा गरजेइतकेच पीठ घेऊन पिकलेल्या केळाचा हात लावून मळावे व त्याचे साधारणपणे पेढ्याएवढे चपटे गोळे करावेत व पोळपाटावर खसखस थोडी -थोडी पसरून पिठाची एकेक गोळी घेऊन बोटाने हलकेच दाब देऊन अनारसा खसखशीवर फिरवत गोल थापावा
आता कढईमधे तूप गरम करावे. खसखशीची बाजू वर येइल अशा पध्दतीने अनारसा कढईमधे अलगद सोडावा.झार्याने त्यावर तूप घालत अनारसा मंद आचेवर तळावा. अनारसा उलटवू नये. सोनेरी रंगावर तळावा.
असा हा खमंग तळलेला कुरकुरीत अनारसा खायला खूप चविष्ट लागतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.
टिप्स :-
* तयार पीठ स्टीलच्या डब्यात ठेऊ नये. काळे पडते.
* तयार पिठ बरेच दिवस म्हणजे अगदी महिनाभर सुध्दा टिकते. खराब होत नाही.
* तांदुळ शक्यतो जूना व जाडाच वापरावा.पीठ फुलून जाळी चांगली पडते.
* एकाच बाजूने तूप झार्याने उडवून तळावा. अन्यथा खसखस तूपामधे सुटते.
* तयार पिठ बरेच दिवस म्हणजे अगदी महिनाभर सुध्दा टिकते. खराब होत नाही.
* तांदुळ शक्यतो जूना व जाडाच वापरावा.पीठ फुलून जाळी चांगली पडते.
* एकाच बाजूने तूप झार्याने उडवून तळावा. अन्यथा खसखस तूपामधे सुटते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment