पाऊस असो किंवा थंडी, गार वातावरण असेल तर चहासोबत कांही चटपटीत खायला हवेच. तसेही चटपटीत खायला कोणाला नाही आवडत? तर आवडीनुसार सगळ्या डाळी थोड्या थोड्या घेऊन मस्त डाळ पकोडे केले. पौष्टीक व चटपटीतही होते. एकदम सोपे आहेत. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* चणाडाळ १ वाटी
* छिलका मुगडाळ १/२ वाटी
* मसूरडाळ १/४ वाटी
* तूरडाळ १/४ वाटी
* उडीदडाळ मूठभर
* कांदा १ चिरून
* हिरवी मिरची,आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
* कोथिंबीर
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* हळद, तिखट, मीठ
* तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम सर्व डाळी धुवून २-३ तास पाण्यात भिजत घालाव्यात. नंतर पाणी निथळून काढून टाकावे व भरड वाटून घ्याव्यात.
आता वाटलेल्या डाळीमधे दिलेला सर्व मसाला व कांदा, कोथिंबीर घालून एकत्र मिश्रण करावे. पाणी अजिबात घालू नये. धट्टच ठेवावे.
आता तेल गरम करून हातानेच लहान-लहान गोळे तेलात सोङावेत व मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळावे.
तयार मस्त गरमा-गरम कुरकुरीत "डाळ पकोडे " चहासोबत किंवा साँस बरोबर खायला द्या.
टिप :
यामधे आवडीनुसार पालक, मेथी चिरून घातले तर अधिक रूचकर लागते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.