एकूणच कोणत्याही भाजीचे पराठे करायला व खायला ही एकदम सुटसूटीत असतात. भाजी ही खाल्ली जाते व पोळीचेही काम होते. डब्यात न्यायला व घरात, कशासोबत ही खाता येतात. लोणचे,दही, लोणी,चटणी अथवा गरमा-गरम नुसतैच. तर चला आज फ्लाॅवर चे पराठे करू. साहित्य व कृती :-
साहीत्य :-
* फ्लाॅवर एक मध्यम आकाराचा गड्ढा
* हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट
* मीठ चविनूसार
* गरम मसाला 1टीस्पून
* हळद, हींग
* चिरून कोथंबिर
* कणिक 4 वाट्या
* तेल
* पाणी
कृती :-
प्रथम कणिक तेल,मीठ घालून नेहमी प्रमाणैच मळून ठेवा.
आता फ्लाँवरची मोठी-मोठी फुले तोडून मीठाच्या पणाने धुवून घ्या.नंतर किसणीवर खिसून घ्या.
नंतर कढईत तेल गरम करा. हळद, हींग घाला. हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट घाला. आता खिसलेला फ्लाॅवर घाला..एक वाफ आणा. नंतर मीठ, गरम मसाला,कोथंबिर घालून थोडे परता. गँस बंद करा. सारण थंड होऊ दे.
आता कणिकेचा उंडा करून त्यामधे तयार सारण भरा व पुरणपोळी प्रमाणे लाटा. तेल सोडून खरपूस भाजा.
गरमा-गरम खायला द्या.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment