"बिस्कीट केक" झटपट होणारा व सहसा न बिघडणारा केकचा सोपा प्रकार आहे. यासाठी लागणारे साहित्य व कृती-
साहित्य :-
* पारले जी बिस्कीटे २० नग
* हाईड अँन्ड सिक बिस्कीटे १० नग
* पीठीसाखर २ टेस्पून
* दूध आवश्यकतेनुसार
* तूप ग्रीसिंगसाठी
* पारले जी बिस्कीटे २० नग
* हाईड अँन्ड सिक बिस्कीटे १० नग
* पीठीसाखर २ टेस्पून
* दूध आवश्यकतेनुसार
* तूप ग्रीसिंगसाठी
कृती :-
प्रथम दोन्ही बिस्कीटे मिक्सरवर पावडर करून घ्यावी.
प्रथम दोन्ही बिस्कीटे मिक्सरवर पावडर करून घ्यावी.
पावडर एका बाऊलमधे काढून घेऊन त्यामधे साखर मिसळावी.
नंतर त्यामधे कोमट दूध घालून ढवळावे. गुठळ्या राहू देउ नयेत.मिश्रण थोडे घटसरच ठेवावे. नाहीतर केक बसका होतो.
आता तयार मिश्रण ग्रीस केलेल्या केकच्या भांड्यात ओतावे व टँप करावे.
प्रीहीट ओवनला 180 ° सेल्सियसला २० मिनिटे ठेवावा. टूथपिक टोचून पहावे स्वच्छ बाहेर आली की केक झाला.
मस्त तयार स्पाँजी बिस्कीट केक चहासोबत खा व खाऊ घाला.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment