सकाळी उठले की आपल्याला बरेच वेळा असा प्रश्न पडतो की मुलांना डब्यामधे आवडीचे पण झटपट व पोटभरीचे असे काय द्यावे?? किंवा संध्याकाळचा नाष्टा काय करावा ? अशा वेळी हे सॅडविच ट्राय करा .भाजी रात्रिच करून फ्रीज मधे ठेवली तरी चालते व ऐत्यावेळी पट्कन ब्रेडला लावून भाजले की डीश तयार ! तर ते कसे करायचे आता पाहू ...
साहीत्य :-
1) सॅडविच ब्रेड 8-10 स्लाइस
2) उकडलेले बटाटे 2 नग
3) मटार अर्धी वाटी
4) टोमॅटो एक
5) कांदा एक
6) मिठ चविनुसार
7) हळद,मिरचिपूड
8) गरम मसाला किंवा पावभाजी मसाला एक चमचा
9)साखर चिमूटभर(ऐच्छीक)
10) तेल
11) टोमॅटो साॅस
12) हिरवी चटणी
13) बटर
कृती :-
प्रथम पॅनमधे थोडेसे तेल घालावे व कांदा टाकावा नंतर मटार घालावेत.मऊ होइपर्यत परतावे.आता चिरलेला टोमॅटो घालावा व मऊ होऊ द्यावा.शेवटी मॅश केलेला बटाटा टाकावा.
आता मिठ,साखर,हळद मिरचीपूड व मसाला घालून निट सर्व मिश्रण हलवावे.पाच मिनिटे परतावे व गॅस बंद करावा.
आता दोन ब्रेड स्लाइस घ्या एका स्लाइसला हीरवी चटणी लावा व त्यावर वरील तयार भाजी पसरा.त्यावर दुसरा स्लाइस ठेवा व वरून बटर लावा.टोस्टरला बटर ची बाजू खाली करून ठेवा व आता वरच्या बाजूला पण बटर लावा म्हणजे दोन्हीकडून टोस्ट खरपूस भाजला जाईल.
असा खरपूस भाजलेला टोस्ट साॅस बरोबर खाण्यास द्या .
No comments :
Post a Comment