कढीपत्ता
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय
स्वयंपाक घरातले एक महाऔषध.
'कढीपत्ता' हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून,ते एक सुंदर आणि साधे औषधआहे.पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले. की, त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते.
कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते.जंगलातला कढीपत्ता जास्त गडद
रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात...आणि झाड मोठे झाले कीत्याच्या बिया आजूबाजूला पडून, कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात.
कढीपत्त्याचे 'आहार' आणि 'औषध' अशा अनुषंगाने उपयोग पाहूया.
१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.
२) जुलाब लागले असता,
कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
'पोटातल्या वेदना' आणि 'जुलाबाचे वेग' वेगाने नियंत्रणात येतात.
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत
करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो,
त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ
मिसळून खावीत.
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे.
नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.
५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर,
कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण 'केमो' आणि 'रेडियो' थेरपी घेत असताना,
त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते.
अशा रुग्णांना दिवसातून तीन
वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून
खायला लावावीत.
रुग्णाला बराच आराम मिळतो.
१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर,
अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे 'अमृत' आहे.
कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर,
कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर,
मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत.
याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.
...असा हा
'बहुगुणी' आणि 'आरोग्यसंपन्न'
कढीपत्ता आहारात नियमित ठेवा.
कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.
above Info C/P
मात्र इतका बहुगुणी कढीपत्ता आपल्या रोजच्या खाण्यात कितीसा येतो? आपण पोहे, उपमा,आमटी, भाजीत असा किती वापरतो? चार-सहा पाने फक्त,! तेही ऐनवेळी हाताशी असला तर ठीक नाहीतर नसतोच. कारण आपण रोज काही कढीपत्ता आणत नाही. आठवड्यातून एकदा भाजीसोबत आणतो व तो दोन दिवसानी पाने गळून वांळून नाहीतर कुजून गेलेला असतो. तर जास्तीत - जास्त कढीपत्ता खाल्ला जावा यासाठी मी आज कढीपत्याची 'ओली चटणी' केली आहे. 'कोरड्या चटणी'ची रेसिपी यापुर्वीच दिलेली आहे. ओल्या चटणीचे साहित्य व कृती 👇
साहित्य :-
* कढीपत्ता पाने एक मोठी वाटी
* चणाडाळ पाव वाटी
* उडीद डाळ मुठभर
* ओलं खोबरं २ चमचे
* चिंच सुपारी एवढी
* लाल सुक्या मिरच्या २
* जीरे लहान अर्धा चमचा
* मीठ चविनूसार
* पाणी गरजेनुसार
कृती :-
प्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टाँवेलवर पसरून कोरडा करावा.
आता गँसवर कढई ठेवून चणाडाळ, उडीद डाळ वेगवेगळी तांबूस भाजावी.
नंतर कढईत चमचाभर तेल घालून लाल मिरची, कढीपत्ता पाने व जीरे,चिंच भाजून घ्यावे.
भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर भाजके पदार्थ व ओले खोबरे, मीठ घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे. वाटताना गरजेनुसार थोडे पाणी घालावे. थोडी घटसरच ठेवावी.
आता वाटलेली चटणी काचेच्या सटात काढून वरून मोहरी, हींग -जीरे व कढीपत्ता घालून केलेली तेलाची थंड फोडणी घालावी.
अशी ही चटकदार चटणी जेवणात रूची आणते भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा मधे मधे चाखायला मस्तच लागते. तसेच कोणत्याही पराठे पुरी सोबत ही खाता येते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका हं ☺
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.