संध्याकाळचे वेळी मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवे असते.सहाजिकच आहे सकाळी उठले की दूध मग गडबडीत नेहमीचाच पोटभरीचा नाष्टा व पोळीभाजीचा टीफीन !मग संध्याकाळी मात्र काहीतरी नविन पाहीजे असते. तर मग हे बीटरूट हार्ट ट्राय करा.कसे करायचे पहा
साहीत्य :-
1) पातळ पोहे 2 वाट्या
2) बीटाचा किस 1वाटी
3) मिठ चविनूसार
4) हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट एक टीस्पून
5) आमचूर पावडर ऐच्छीक
6) गरम मसाला 1चमचा
7) ब्रेडक्रम्स किंवा काॅर्नफ्लोअर दोन टेबलस्पून
8) तेल
कृती :-
प्रथम पातळ पोहे धुवून चाळणीत पाणी निथळण्यास ठेवावे.
बीट साल काढून बारीक किसणीवर किसून घ्यावे.
नंतर वर आधि भिजवून ठेवलेले पोहे चांगले मळून घ्यावेत.
आता त्यामधे किसलेले बीट,मीठ,गरम मसाला,मिरची आले लसूण पेस्ट काॅर्नफ्लोअर घालून परत एकदा नीट मळून मिक्स करून गोळा तयार करावा.
आता तयार पीठाचे लहान गोळे करून घ्यावेत व पोळी लाटावी.साच्याने लहान-लहान बदामाचे आकार कापून घ्यावेत.गरम तेलात तळावे.
थोडे थंड झाले की एकदम खुसखूषीत होतात लगेच साॅस सोबत सर्व्ह करा.अथवा नूसतेही चहा बरोबर देता येतात.
टीप :- फार गार होऊ देऊ नयेत.भजीप्रमाणे गार झाले की मऊ पडतात.म्हणून लगेचच संपवावेत.