"दोडक्याचा कोरडा" ही पारंपारिक पाककृती आहे. दोडक्याची डाळ घालून, दोडका, बटाटा, कांदा मिक्स भाजी, रस्साभाजी.. . भरला दोडका असे बरेच प्रकार आहेत. आज थोडे वेगळ्या पध्दतिने भाजी करण्याचे ठरविले व या पारंपारिक पध्दतिची भाजी केली साहित्य व कृती,
साहित्य :-
* दोडका पाव किलो
* कांदा १
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* कोथंबिर
* आमचूर पावडर किंवा लिंबूरस
* भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर
* तेल १ टेस्पून
* हळद,हिंग, मोहरी
कृति :-
प्रथम दोडके स्वच्छ धुवून साल काढून, खिसणीवर किसून घ्यावे. कांदा, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.
नंतर कढईमधे तेल गरम करून हळद, हिंग, मोहरीची फोडणी करून घ्यावी.
फोडणीमधे कांदा व आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी व चांगले परतून घ्यावे.
परतेल्या मसाल्यामधे दोडक्याचा किस घालावा. मीठ, साखर घालावी व परतावे. किस मऊ झाल्यावर शेंगदाण्यांचा कूट घालावा व वर झाकण ठेवून एक वाफ काढावी.
तयार भाजीमधे वरून लिंबू पिळून सारखी करावी व कोथंबिर घालावी. गरम भाकरी, चपाती सोबत खावी.
या भाजीला शिजण्यासाठी पाणी घालण्याची गरज पडत नाही म्हणून याला "कोरडा" असे म्हणतात.
No comments :
Post a Comment