02 November 2014

मिक्स डाळीच्या खमंग वड्या(Dalichya Wadya)

No comments :
साहित्य :-

* चणा डाळ १ वाटी
* तूर डाळ १ /२ वाटी
* मसूर डाळ १/२ वाटी
* हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट २ चमचे
* बारीक चिरलेली कोथिंबिर
* मीठ चवीनुसार
* चिमूटभर सोडा
* फोडणीसाठी तेल,तिळ,मोहरी,हींग ,हळद
* कडीपत्ता

कृती :-
प्रथम सर्व डाळी २-३ तास भिजवून,वाटून घ्याव्यात.नंतर त्यामध्ये आले,लसूण,मिरची पेस्ट,मीठ,सोडा ,थोडी कोथिंबीर व थोडी हळद घालून गोळा करावा.

आता तयार मिश्रणाचे लहान-लहान लाटे (पेळू) करून चाळणी ठेवून किवा स्टीमर मध्ये १०-१५ मिनिटे   वाफवून घ्यावेत.

थंड झाल्यानंतर सुरीने त्याच्या वड्या कापाव्यात. नंतर एका लहान कढल्यात हींग,मोहरी,तिळ,कडीपत्ता घालून चांगली फोडणी तयार करावी व तयार वड्यांवर घालावी.

अशा फोडणी दिलेल्या वड्या डिश मध्ये काढून कोथिंबिर घालून चहा बरोबर खाण्यास द्याव्यात .अथवा जेवणात सुद्धा साईड डिश म्हणून ठेवता येतात.

टीप :- डाळी वाटताना त्यामध्ये पाणी कमीत-कमी वापरावे.अन्यथा सैल राहिले तर,गोळा बनणार नाही.



       

No comments :

Post a Comment