02 November 2014

मसाले भात (Masala Rice)

No comments :
साहित्य:-
* बासमती किंव्हा आंबेमोहर तांदूळ २ वाट्या  (शक्यतो जुना तांदूळ वापरावा.)
* मटार अर्धी वाटी
* फ्लॉवरचे तुरे अर्धी वाटी
/ तोंडली,चिरून १/४ वाटी
* वांग,उभे चिरून
* गाजर, सोलून, तुकडे करून
* फरसबी- तुकडे करून
* भिजवलेले शेंगदाणे
* काजू
* मोहरी,हिंग,हळद,कडीपत्ता
* तेल- ५ टेबलस्पून फोडणीसाठी
* गरम पाणी ४ वाट्या
* मीठ चवीनुसार
* काळा मसाला/गोडा मसाला+मिरची पूड ४ टेस्पून
* बारीक चिरलेली कोथिंबीर
* खवलेला नारळ

कृती:-
प्रथम तांदूळ आणि सर्व भाज्या धुउन बाजूला ठेवाव्यात नंतर भाज्या चिरून घ्याव्यात.
नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की काजू, कडीपत्ता, हळद, हिंग टाकावा. सर्व भाज्या, शेंगदाणे, टाकून मिनीटभर परतून घ्यावे.

नंतर त्यात तांदूळ, काळा मसाला आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा वेळ परतून घ्यावे व त्यात गरम पाणी टाकून वीस मिनिटे झाकण ठेऊन मंद आचेवर भात शिजवावा. मधेमधे हलक्या हाताने भात हलवावा.

आता भात  शिजल्यावर गॅस बंद करावा.पाच ते दहा मिनिटे वाफ चांगली मुरू द्या.
आता तयार भात वरून कोथिंबीर आणि खोबर घालून गरमागरम वाढा.

टीप :-यातील भाज्या व भाज्यांचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार बदलावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment