28 January 2015

तिरंगा सलाड (Tiranga Salad )

No comments :

सलाड किंवा कच्या कोशिंबरी, रायते नेहमीच जेवणात असावेत असे सर्वच आहारतज्ञ व घरातील अनुभवी लोक म्हणत असतात.बरेच वेळा आपण वेळ नाही म्हणून पट्कन नुसती पोळी-भाजीच खाऊन घेतो.तसेच जर रोजचा डबा असेल तरी दुपारचे जेवण तितके व्यवस्थित घेतले जात नाही.आज 26 जानेवारी ची सुट्टी असलेने व सर्वजण घरातच असलेने सर्व व्यवथितच लागते.फ्रिज उघडला तर सलाड साठी कोणतीच एक भाजी पुरेशा प्रमाणात नव्हती,मग त्यातून हे सलाड सुचले व नामकरण 'तिरंगा सलाड' असे झाले.ते कसे केले पहा !

साहीत्य :-

1) लाल टोमॅटो 2
2) लाल गाजर 2
3) पांढरा मुळा अर्धा किंवा लहान एक
4) काकडी 1
5) पांढरा कांदा 1
6) हिरवी कांदापात,हिरवी मिरची एक
7) कोथिंबिर मूठभर
8) लिंबू अर्धा
9) काळे मिठ
10) चाट मसाला

कृती :-

  प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात.

नंतर सर्व बारीक चिरून घ्यावे.गरज वाटली तर काकडी,गाजर,मुळा याच्या साली काढा.अन्यथा तसेच घ्या.

आता हे चिरलेले साहीत्य सर्व एका बाऊल मधे मिक्स करा व झाकून ठेवून द्या.अगदी ऐत्यावेळी मिठ व चाट मसाला  घालून वर लिंबू पिळून हलवा व पानात वाढा.

रंग-बिरंगी झाल्याने दिसायला खूपच छान दिसते व लहान मुले पण आवडीने खातात.

27 January 2015

मैद्याचे दुष्परीणाम

No comments :

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.

मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही. परंतु मद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मदा वापरतात. उदा - बिस्किट्स नानकटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, रोटी, नान, नूडल्स, केक हे सर्वच पदार्थ मद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया : गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी परिरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.

गुणधर्म खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मद्यामध्ये असतो. मद्यांमध्ये फक्त काबरेहायड्रेट्स, जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर होते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतडय़ामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हेही आजार वाढीस लागतात. मद्यामध्ये शरीराला पोषक अशी नसíगक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते. उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.

आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या क्रियेत क्रोमियम, िझक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नसíगक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो कमी प्रमाणात खावा. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नसíगक मूलद्रव्ये आवश्यक आहेत; परंतु समाजातील उच्चभ्रू सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मद्याच्या पदार्थाना गरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

पर्यायी पदार्थ- सर्व पदार्थ बनविण्यासाठी मद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्त्य देशांमध्येसुद्धा मद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.

मुलांना पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नसíगक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वाचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही. डॉ. शारदा महांडुळे

करून पहावे असे काही

No comments :

* भाजी, रस्सा यावर तेलाचा। तवंग 
दिसण्यासाठी फोडणीत चिमूटभर साखर  घालावी.भाजीला रंग छान येतो

* दही वड्याचे दही घुसळताना त्यात थोडे नारळाचे दूध घालावे.वडे अत्यंत स्वादीष्ट लागतात.

* थंडीमधे दही लवकर लागत नाही म्हणून कुकर गरम करून त्यात भांडे ठेवावे.व झाकण बंद करावे.

* कोथिंबिर निवडल्यावर देठे टाकून न देता, त्यामधे मिरची व कच्चे शेंगदाणे घालून थोड्या तेलावर परतावे आणि चवीला मीठ घालून वाटावे.छान चटणी बनते.

* गवारीची भाजी शिजवताना थोडे दूध घालावे.भाजी मिळून येते.

* भजी करताना नुसते डाळीचे पिठ घेण्याऐवजी जोडीला थोडे तांदुळ किवा ज्वारीचे पिठ घ्यावे. भजी कुरकूरीत होतात. तसेच पचनाला पण त्रास होत नाही.

* भाज्या आधि धुवून मगच चिराव्यात. म्हणजे त्यातील  व्हिटामिन जात नाहीत.

दूध,दूधाचे प्रकार,उपयुक्ततता

No comments :


गायीचे दूध,दूधाचे फायदे
********************
म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण पाच टक्के कमी असूनही त्यात शरीराचे पोषण करण्याची क्षमता असते. मानवी शरीराला सहज सात्म्य होणाऱ्या गायीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. माझे एक वैष्णव मित्र नेहमी परदेशात प्रवास करतात. कांदा-लसूण खात नाहीत. त्यामुळे परदेशात जेवणाची पंचाईत होते. काहीच मिळाले नाही तर ते गायीचे दूध पितात. गायीचे दूध हे जगभर कुठेही मिळू शकते, तसेच ते सर्वव्यापी, सहज उपलब्ध, तुलनेने स्वस्त आहे. या गोरसाला अमृताची उपमा दिली आहे. मानवी आरोग्याला, स्वास्थ्याला, रोगनिवारणाला गायीच्या दुधाची अपार मदत होते. आधुनिक शास्त्राप्रमाणे गायीच्या दुधात चरबीचे प्रमाण पाच टक्के आहे. म्हशीच्या दुधात आठ टक्के चरबी असते. कमी चरबी असून शरीराचे पोषण करण्याचा गायीच्या दुधाचा विलक्षण गुण आहे.

आयुर्वेदशास्त्राने गाय, म्हैस, बकरी, मेंढी, हत्ती, उंट, गाढव व स्त्री अशी आठ दुधांची वर्गवारी केली आहे. लहान बालकापासून आपल्या जीवनात गोदुग्ध प्रवेश करते. मातेचे दूध कमी पडते, त्यावेळेस सहजपणे गायीच्या दुधाकडे वळता येते. ते मानवी शरीराला सहज सात्म्य होते. मधुर रस, शीतवीर्य, मधुर विपाक असे शास्त्रातील गुण असलेले गायीचे दूध वातविकार व पित्तविकाराच्या रुग्णांना फार उपयुक्त आहे. कफग्रस्त विकाराच्या रुग्णांनी गायीचे दूध सकाळी आणि योग्य अनुपानाबरोबर घ्यावे. निरामय, दीर्घायुष्य जगू इच्छिणाऱ्यांनी सकाळी गायीचे दूध घ्यावे. कफ होत असेल तर किंचित मिरेपूड किंवा मध मिसळून घ्यावे. पोट खळबळत असेल तर सुंठ पूड मिसळून दूध प्यावे. कृश व्यक्तींचे वजन वाढते. गायीच्या दुधाचा खरा उपयोग कावीळ, जलोदर, यकृत व पांथरीची वाढ या विकारात होतो. पाणी पिण्यावर व आहारावर नियंत्रण असते या विकारात केवळ गोदुग्ध आहारावर राहून रोगी बरे होतात. एक-दीड लिटपर्यंत गायीचे दूध रोज प्यावे. कावीळ, जलोदर किंवा यकृतशोध विकारात पोट साफ होणे आवश्यक असते. दुग्धाहाराने प्रथम जुलाब होतात, पण रोगप्रतिकारकशक्ती वाढते. गायीच्या दुधाचा प्रमुख गुण रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे हा आहे. हाच गुण एड्स या विकारात गायीचे दूध नियमित घेणाऱ्यांना येईल. एड्सच्या भयंकर विळख्यातून बाहेर पडावयास गायीच्या दुधासारखे सहजसोपे औषध नाही. याचप्रकारे उन्माद, अपस्मार, फेपरे या मानसिक विकारात, दीर्घकाळ मेंदू झोपवणारी औषधे घेणाऱ्यांनी नियमित गायीचे दूध घेतल्यास या मादक गोळय़ांपासून नक्कीच छुटकारा मिळतो. गायीचे दूध त्वचाविकार, आम्लपित्त, अंगाची आग, खाज, अल्सर, पित्तप्रधान पोटदुखी, झोप न लागणे, हातापायांची व डोळय़ांची आग, डोळय़ांची लाली, शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, मलावरोध, आतडय़ांचा क्षय, टीबी, मूळव्याध, भगंदर, दारूचे व्यसन, तंबाखूचे दुष्परिणाम, तोंडातील व्रण, कोणत्याही जखमा, मधुमेह इत्यादी नाना विकारांत उपयुक्त आहे. फाजील कफ न वाढवता शरीरात ठिकठिकाणी साठलेली उष्णता, फाजील कडकी, गायीच्या दुधाने कमी होते. शरीराची दर क्षणी होणारी झीज भरून येते. अल्कोहोल किंवा निकोटीनमुळे शरीरात ठिकठिकाणी व्रण होतात. ते मुळापासून बरे होतात. गालाचा, घशाचा, आतडय़ांचा, यकृताचा कॅन्सर या विकारात निव्वळ गायीच्या दुधावर बरे होता येते. सोरायसिस या किचकट विकारात गायीचे दूध नवजीवन देते. सूर्याच्या शापाला ‘गोमातेचे पुण्य’ हे मोठे उत्तर आहे. दीर्घकालीन तापातून, विशेषत: टायफॉइड, मलेरिया, टीबी या तापातून बाहेर पडताना गोदुग्धाचा आश्रय घ्यावा. गायीचे दूध स्वच्छ आहे याची खात्री असावी. कारण कोणतेही दूध उकळले, नव्हे खूप आटले तरी त्यातील काविळीचा किंवा टायफॉइडचा जंतू मरत नाही. थोडे पाणी मिसळून, दूध पुन्हा आटवून घेणे सर्वात चांगले.

मुळव्याधीवर ताकाचा उपाय मूळव्याध हा भयंकर पीडा देणारा रोग केवळ ताक व ज्वारीची भाकरी खाऊन, औषधाशिवाय बरा होऊ शकतो. मोड मुळातून नाहीसे होतात.

ताक आंबट नको. पोटदुखी, अजीर्ण, अरुची, अपचन, उदरवात, जुलाब एवढेच काय पण पाश्चात्त्य वैद्यकाने असाध्य ठरविलेला ग्रहणी, संग्रहणी, आमांश हा विकार भरपूर ताक पिऊन बरा होऊ शकतो. ताक व तांदळाची भाकरी असा आहार ठेवला तर आमांश विकार नि:शेष बरा होईल. मलावरोधाची जुनाट खोड असणे, मूळव्याध, भगंदर या विकारांत रात्री गायीच्या दुधाबरोबर एक चमचा तूप घ्यावे. गायीच्या दुधाबरोबर रोगपरत्वे सुंठ, मिरी, पिंपळी, वावडिंग, शोपा, ओवा, मध, तुळशीची पाने, आले, लसूण अशी नाना अनुपाने वापरता येतील. दम्याच्या विकारात एक कप गोदुग्ध, दहा-पंधरा तुळशीची पाने आणि दोन लेंडी पिंपळी व एक कप पाणी असे उकळून, पाणी आटवून रोज सकाळी घ्यावे. यामुळे कफ बनण्याची प्रक्रिया थांबते. फुप्फुसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ब्रॉन्कायटिस किंवा क्षय विकाराची धास्ती राहत नाही. पोटात वात धरणे, गुबारा धरणे या विकारात ज्यांना लसूण उष्ण पडते त्यांनी गायीचे दूध व पाणी प्रत्येकी एक कप घेऊन लसणीच्या पाच-सात कांडय़ा त्यात उकळाव्या. पाणी आटवून ते प्यावे. पोटात वायू धरण्याची खोड मोडते. सर्दी, घसा बसणे, पडसे या विकारात रात्री दूध घेतल्यास लगेच आराम पडतो. अल्सर, पोटदुखी, आम्लपित्त, काँग्रेस गवताची अॅलर्जी, शरीराची आग होणे, नागीण, तोंड येणे, क्षय या विकारांत मनुका उकळून ते दूध घेतल्यास लवकर बरे वाटते. विस्मरण, खूप तहान लागणे, शरीर निस्तेज होणे, खूप भूक लागणे, जुनाट या विकारांत दहा-वीस धने गायीच्या दुधात उकळून ते दूध प्यावे.

दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हशीचे दूध वजन वाढवण्यास उपयुक्त आहे. कृश माणसाला झोप येत नसल्यास रात्री म्हशीचे दूध प्यावे. उत्तम झोप लागते. शेळय़ा कमी पाणी पितात. त्यांचा आहार कडू, तुरट, तिखट असा असतो. त्यांचे हिंडणे-फिरणे खूप. त्यामुळे त्यांचे दूध पचावयास हलके असते. क्षय, दमा, ताप, जुलाब, डोळय़ांचे विकार, रक्तपित्त व मधुमेह विकारांत शेळीचे दूध म्हणजे टॉनिक आहे. तुलनेने मेंढय़ांचे दूध कमी गुणाचे आहे. ते उष्ण असून वात विकारात उपयुक्त आहे. उंटिणीचे दूध जलोदर, पोटफुगी, मूळव्याध, शरीरावरील सूज या विकारात उपयुक्त आहे. शरीरास बळकटी आणण्यास हत्तिणीचे दूध उपयुक्त आहे. घोडी, गाढवी यांचे दूध हातापायांच्या विकारात उपयुक्त आहे. शरीरात खूप रूक्षता असल्यास निरसे न तापविलेले किंवा धारोष्ण दूध प्यावे. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी दूध तापवून मगच प्यावे. अंगावरचे, स्त्रीचे दूध डोळय़ांच्या वात, पित्त किंवा रक्तदोष विकारांत फार उपयुक्त आहे. डोळय़ांत चिपडे धरणे, चिकटा असणे, उजेड सहन न होणे याकरिता स्त्रीच्या दुधाचे थेंब डोळय़ात सोडावे.

दूध कोणी घेऊ नये? नवीन आलेला ताप, वारंवार जुलाब होण्याची सवय, पोटात खुटखुटणे, कळ मारून मलप्रवृत्ती, अग्निमांद्य, लघवीला अडथळा असणे, लघवी कमी होणे, मूतखडा, लहान बालकांचा दमा, खोकला व कफ विकारात दूध हितकारक नाही. अजीर्ण, आमवात, वृद्ध माणसांचा रात्रीचा खोकला या विकारात दूध वज्र्य करावे. कफ प्रकृती असणाऱ्यांनी किंवा शौचाला खडा होण्याची सवय असणाऱ्यांनी रात्री दूध घेऊ नये. कावीळ किंवा टायफॉइडचा ताप या विकारात औषधांचा गुण येत नसेल तर दूध किंवा दुधाचे पदार्थ लगेच बंद करावे. आराम मिळतो.

ताक इंद्रालासुद्धा हवेहवेसे वाटणारे ताक आजच्या सततच्या वाढत्या महागाईच्या दिवसात अनेक विकारांवर उत्तम औषध आहे. योग्य प्रकारे तापविलेल्या दुधात किंचित कोमट असताना नाममात्र विरजण लावल्यास उत्तम दर्जाचे मधुर चवीचे दही तयार होते. त्या दह्यचे आपल्या गरजेनुसार गुण ताज्या ताकातच आहेत. दही खाण्याचा अतिरेक होऊन मूळव्याध, सूज, अजीर्ण, खाज, कंड, कफ, दाह असे विकार उत्पन्न झाले तर त्यावर ताक हा उत्तम उतारा आहे. ‘ताजे’ किंचित तुरट असलेले ताक सुंठेबरोबर घेतल्यास हे कफावरचे उत्तम औषध आहे. खूप तहान लागणे, शोष या विकारात व उन्हाळा, ऑक्टोबर महिना या काळात सकाळी नियमितपणे ताक प्यावे. पावसाळय़ात सुंठ चूर्ण किंवा मिरेपूड मिसळून ताक प्यावे. लघवी कमी होणे, लघवी लाल होणे, तीडिक मारणे, उपदंश विकार, एड्स विकारात इंद्रियांचा दाह होणे, ओटीपोटात कळ मारणे, पक्काशयात अन्न कुजणे, शौचाला घाण वास मारणे, जंत-कृमी इत्यादी अपान वायूच्या तक्रारीत एक दिवस केवळ ताकावर राहावे. ताकाबरोबर चवीकरिता आले, लसूण, सुंठ, मिरी, जिरे, मीठ वापरावे. वृद्ध माणसांनी ताक सकाळी प्यावे. सायंकाळी पिऊ नये. कारण त्यांना खोकल्याचा त्रास होऊ शकतो. पोटात वायू धरण्याची तक्रार असल्यास ताकाबरोबर हिंग, लसूण, आले, जिरे, हिंग्वाष्टक चूर्ण असे पदार्थ प्रकृतिमानाप्रमाणे वापरावे. स्थूल व्यक्तींनी दुधाऐवजी ताक प्यावे. भरपूर लघवी होऊन वजन कमी व्हायला मदत होते. शरीरातील फाजील सूज, पांथरी, गुल्म (टय़ूमर), विषबाधा विकारात ताक लगेच गुण देते. ताक कोणी पिऊ नये? सर्दी, पडसे, खोकला, नाक चोंदणे, रात्री वारंवार लघवीकरिता उठणाऱ्यांनी किंवा अंथरुणात शू होत असल्यास व दमेकरी व्यक्तींनी ताक घेऊ नये. विशेषत: सायंकाळी व हिवाळय़ात थंड हवेत ताक वज्र्य करावे. ज्यांना मुंग्या येतात, जे कृश आहेत. ज्यांचे रक्त कमी आहे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे, ज्यांच्या पोटऱ्या दुखतात, त्यांनी ताक वज्र्य करावे. कान वाहत असल्यास, शौचाला खडा होत असल्यास ताक घेऊ नये.

वैद्य प. य. खडीवाले वैद्य

26 January 2015

मिक्स भाज्यांचे पौष्टीक थालिपिठ (Mix Veg. Healthy Thalipith)

No comments :

नेहमीच मुलांना असे म्हणणे योग्य होणार नाही म्हणून आज आपल्याला किंवा मोठ्याना असे म्हणते.काय होते रोज-रोज सकाळी उठले की, पोळी -भाजी करायचे, वर्कींग असू तर डब्यात न्यायचे,घरातल्याना द्यायचे किवा घरात असू तरी तेच खायचे एकट्यासाठी वेगळे काय करायचे ? परत संध्याकाळी तेच !जाम कंटाळा येतो.पण पोट कुठे कंटाळतेय ? जिभेला पण काही चवदार हवेच असते आणि शरीराला पौष्टीक ! चला तर आपण मस्त थालीपिठ बनवू.कसे ते पहा !

साहीत्य :-

1) किसलेले गाजर
2) किसून सिमला मिरची
3) किसलेला मुळा
4) बारीक चिरून कांदापात
5) एक मध्यम कांदा किसून
6) तिळ एक लहान चमचा
7) ओवा,हींग एक लहान चमचा
8) तिखट,मिठ चवीनुसार
9) थालीपिठाची भाजाणी किंवा घरात असलेली सर्व पिठे मिक्स घ्यावीत
10)धना-जिरा पावडर
11) तेल भाजण्यासाठी

कृती :-

       प्रथम सर्व भाज्या एकत्र कराव्यात.नंतर त्यात मावेल इतकेच पिठ घालावे.

आता बाकीचे सर्व साहीत्य घालून मिक्स करावे व गरज वाटली तर थोडा पाण्याचा हात घ्यावा आणि पिठ चांगले मळावे.

नंतर पिठाचा एक चेंडू एवढा गोळा घ्यावा व थंड तव्यावर तेल लावून त्यावरच थापावा.मधे बोटाने भोकं पाडून तेल सोडावे.उलट-सुलट नीट खरपूस भाजावे.

खमंग तयार थालीपीठ लोणी/दही घेऊन खावे.

टीप :- वर सांगितलेल्या सर्व भाज्या व भाज्यांचे प्रमाण उपलब्धते नुसार घ्यावे.

24 January 2015

मलईदार मलई पुराण (Malaidar Malai Puraan)

No comments :

मलईचे विविध उपयोग
******************
सकाळी उठल्याउठल्या आपल्याला वाफाळणारा चहा किंवा काॅफी लागते.चहा किंवा काॅफीला खरी खुमारी येते ती दूधामुळे.हेच दूध घेण्यासाठी आपण फ्रिजकडे वळतो.आत ठेवलेल्या दुधावर सायीचा जाड थर जमा झालेला असतो.यालाच मलई असे म्हणतात.याच मलई पासून घरगूती  लोणकढी तूप बनते.पण आजकाल हेल्थ काॅन्शिअसनेस वाढला असल्याने बरेच जण स्किम मिल्कच घेतात.या दूधामधील फॅट्स आधिच काढलेले असतात.त्यामुळे त्याला जास्त मलई येत नाही.गाईच्या दुधाला पण जास्त मलई येत नाही.पण म्हशीच्या दूधाला मात्र भरपूर मलई येते.आठवडाभर जर मलई साचविली तर त्यापासून 250 ग्रॅम साजूक तूप मिळते.असे साजूक वापरल्याने जेवणाची लज्जत वाढते व असे साजूप तूप रोज एक चमचा आपल्या  शरीराला आवश्यक पण आहे.

मलई जमविण्याची उत्तम पध्दत म्हणजे रोज एका बाउलमध्ये ती काढून फ्रिजमधे ठेवावी.नाहीतर ती लगेच खराब होते.पुरेशी मलई जमा झाली की (चार दीवसाची) त्यात चमचाभर दही/ताक घालावे व घुसळावे.चार-पाच तास तसेच ठेवून द्यावे.सिझन प्रमाणे वेळ कमी-अधिक होतो.

आता घट्ट विरजण लागले असेल ते परत लोणी निघेपर्यंत घुसळा.पांढरेशुभ्र स्वच्छ लोणी मिळते.हे लोणी ब्रेडला लावून ,तसेच गरमा गरम भाकरी/थालीपिठा सोबत अतिशय चवदार लागते.असे घरचे लोणी लहान मुलांची हाडे बळकट होण्यासाठी पण खुप उपयुक्त असते.लोणी काढलेले ताक सुध्दा खूप चवदार आणि उपयोगी असते.ते जेवणात वापरावे.कढी करावी किवा नूसते प्यावे. ढोकळा, उपमा,आमटी इ.गोष्टीतपण वापरता येते.

मलई अनेक पदार्थामध्ये वापरली जाते.
मलई कोफ्ता,मेथी मटार मलई,मेथी मलाई मक्कई अशा भाज्या मलई शिवाय बनूच शकत नाहीत.पदार्थात मलई वापरल्याने त्याचा पोत तर सुधारतोच शिवाय चव ही छान येते. पण रोजच्या जेवणात मलईचा वापर करू नये त्यात फॅट्स भरपूर असतात .मलईमुळे पदार्थातील कॅलरीजही वाढतात.पण बदल म्हणून कधितरी एखादे दिवशी मलई घालून भाजी करायला हरकत नाही.

कुल्फी बनविताना मलई घालावी.म्हणजे कुल्फीचे मिश्रण दाट होते.मावा किवा काॅर्नस्टार्च वापरावे लागत नाही.

मलईमधे एक छोटा कांदा चिरून,टोमॅटो व मिरची बारीक चिरून व चविपुरते मिठ घालून हे मिश्रण ब्रेडला लावा व टोस्ट बनवा.मलई सॅडविच तयार !थंडीत खूप मस्त लागते खायला.

तसेच नुसते ब्रेडला मलई लावून साखर भुरभूरा लहानाना हे सॅडविच आवडेल .

पराठा किवा ठेपल्याची कणिक भिजवताना तेल तूपा ऐवजी मलई वापरा. अतिशय मऊ पराठे बनतात.

अशा प्रकारे विविध प्रकारे मलईचा वापर करता येतो .

22 January 2015

किचन टीप्स ( Kitchen Tips )

No comments :

1) आले-लसूण पेस्ट जास्तीची जर करून ठेवायची असेल तर त्यामधे एक चमचाभर तेल घाला चांगली टिकते व रंगही बदलत नाही.

2) गुळ-पोळी बनविताना गुळामधे थोडासा चूना घालावा.गुळ पोळी फूटून बाहेर येत नाही.

3) कणिक भिजवताना कोमट पाणी वापरले तर पोळ्या अतिशय मऊ होतात व रंग पण पांढरा येतो.

4) शेंगदाणे भाजल्यावर कढईमध्ये थोडे मिठ टाकावे व त्यावर दोन मिनिट झाकण  ठेवावे म्हणजे शेंगदाण्याची साले सहज व पट्कन निघतात.

5) साखरेला मुंगया येऊ नयेत म्हणून त्यात चार-पाच लवंगा टाकाव्यात.

21 January 2015

कोथिंबिरीचा ढोकळा (Kotimbircha dhokala)

No comments :

साहीत्य :-

1) कोथिंबिर 2 वाट्या (धुवून बारीक चिरलेली)
2) डाळीचे पिठ 1वाटी
3) बारीक रवा 1/4 वाटी
4) मिठ चवीनुसार
5) मिरची-लसुण पेस्ट
6) हींग,तिळ,हळद
7) तेल एक टेबलस्पून
8) दही दोन टेस्पून
9) पाणी
10) इनो फ्रुट साॅल्ट 3/4 टीस्पून

कृती :-

प्रथम कढईमध्ये तेल तापवून त्यात हींग,तिळ हळद घालून फोडणी करावी व त्यामधे चिरलेली कोथिंबिर टाकावी.थोडी परतून वाफवावी आणि गॅस बंद करावा.

आता एका बाऊलमध्ये डाळीचे पिठ,रवा घ्यावे.
त्यामधे मिरची-लसूण पेस्ट व मिठ घालावे.दही घालावे व पाणी घालून नीट मिक्स करावे.

आता वर वाफवलेली कोथिंबीर घालावी व गरज वाटल्यास अजून थोडे पाणी घालून भजीच्या पिठा इतपत सैल मिश्रण तयार करावे.

आता आधि ढोकळा स्टॅडच्या थाळीला तेलाचा हात लावून घ्यावा. कुकर मधे तळाला पाणी घालून गरम करण्यास ठेवा.

नंतर सगळ्यात शेवटी तयार मिश्रणात इनो पावडर घालून एकाच दिशेने हलवून मिक्स करावे व झटपट थाळीत ओतावे आणि शिट्टी न लावता पंधरा मिनिट वाफण्यास ठेवावे.

थंड झाल्यावर सुरीने वड्या कापाव्यात व खाण्यास द्यावे.

टीप :- आपल्याला जास्त चटपटीत आवडत असेल तर अजून वरून फोडणी तयार करून घालावी.नाहीतर तसेसुध्दा छान लागते.