बिट हे एक अत्यंत उपयुक्त असे कंद आहे.याच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.परंतू ते सहसा जास्त खाण्यात येत नाही.मुलांना जास्त आवडत नाही,तेव्हा त्याच्या पूढे दिल्याप्रमाणे पुर्या कराव्यात. पटापट् खाल्या जातात व बीट पोटात जाते.
साहित्य:
* एका बिटाचे साल काढून केलेले तुकडे
* आले,लसूण,मिरची आवडीप्रमाणे
* मीठ चवीनुसार
* गव्हाचे पीठ आवशक्यतेनुसार (एका बिटाला साधारण चार वाट्या पीठ लागते )
* तेल तळणीसाठी
* तिळ एक चमचा
* आले,लसूण,मिरची आवडीप्रमाणे
* मीठ चवीनुसार
* गव्हाचे पीठ आवशक्यतेनुसार (एका बिटाला साधारण चार वाट्या पीठ लागते )
* तेल तळणीसाठी
* तिळ एक चमचा
कृती:-
प्रथम बिटाचे तूकडे व आले,लसूण,मिरची मिक्सरमधे वाटून पेस्ट करून घ्यावे. वाटताना गरज वाटली तर थोडे पाणी वापरावे.जास्त नको.
आता एका बाऊलमधे पेस्ट काढून घ्यावी व त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालावे.चवीला मीठ व शोभेसाठी तिळ घालून पाणी घेउन नेहमीच्या पुरीच्या कणिकेप्रमाणे थोडी घट्ट कणिक मळावी.तेल लावून दहा मिनीटे झाकून ठेवावी.
नंतर गँसवर कढई तापत ठेवावी व त्यात तेल गरम करावे.आता भिजलेल्या कणिकेच्या लहान-लहान पुर्या लाटून तळाव्यात.
साॅसबरोबर अथवा नुसत्यापण खाण्यास छान लागतात.त्यांचा लालसर गुलाबी रंग खूप आकर्षक दिसतो.त्यामूळे मुलेसुध्दा पट्कन खातात. मुलांना डब्यात द्यायला खूप सोइचे होते.
टीप : वाटताना जास्त पाणी घालू नये.नाहीतर पेस्ट पातळ होईल व जास्त पीठ घालावे लागेल.आणि पुर्याना अपेक्षित लाल रंग येणार नाही. फिक्क्या पांढरट दिसतील.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment