अश्विन महिन्यातील पौर्णिमा कोजागरी किंव्हा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर येथे कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते. असे मानले जाते की रात्री देवी लक्ष्मी घरोघरी येते आणि 'को जागर्ती' म्हणजे 'कोण जागे आहे?' असे विचारून जे जागे आहेत त्यांना ती आशिर्वाद देते. म्हणूनच रात्री जागरण केले जाते. रात्री १२ वाजता मसाले दुधाचा देवाला नैवेद्य दाखून दुधाचे पातेले गच्चीवर नेतात। त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसेल असे ठेऊन चंद्राची पूजा केली जाते. नंतर सगळ्यांना हे मसाला दुध प्यायला दिले जाते. कोजागरी पौर्णिमेलाच मसाला दुध करतात असे नाही. सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू अशा प्रसंगी देखील मसाला दुध केले जाते. कसे करायचे पहा 👇
साहीत्य:
* दूध एक लिटर (फुल क्रिमचे म्हशीचे घ्यावे)
* साखर अर्धी वाटी(आवडीनुसार कमी-जास्त करावी)
* वेलचीपूड १ टीस्पून
* जायफळ १/२ टीस्पून
* बदाम,काजू,पिस्ता ची भरड पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत)
* चारोळी १ टीस्पून
* केशर चिमुटभर
* साखर अर्धी वाटी(आवडीनुसार कमी-जास्त करावी)
* वेलचीपूड १ टीस्पून
* जायफळ १/२ टीस्पून
* बदाम,काजू,पिस्ता ची भरड पावडर दोन टेस्पून (सजावटीसाठी थोडे पातळ काप ठेवावेत)
* चारोळी १ टीस्पून
* केशर चिमुटभर
कृती:
प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यामधे दुध तापण्यासाठी गॅसवर ठेवावे. तापून फुगा आला की,गॅस बारीक करावा व त्याच्यामधे डाव टाकावा अथवा एक काचेची चहाची बशी पालथी टाकावी म्हणजे दुध तळाला लागत नाही.आणि पाच मिनीटे उकळू द्यावे.
उकळून थोडे आटले की त्यामधे वेलची,,सुक्या मेव्याचे कुट व साखर आणि केशर घालावे.एक उकळी आणावी व गॅस बंद करावा.
सजावटीसाठी शिल्लक ठेवलेले सुकामेव्याचे काप व चारोळ्या वरून घालावेत व आवडीप्रमाणे ,फ्रिजमधे थंड करून किंवा गरम पिण्यास द्यावे.शक्यतो कोमटसर दुधच प्यावे.चविला छान पण लागते व थंड दुधाने पोटात गॅस होतात,ते होण्याची भिती पण रहात नाही.
टीप :-
* सुक्यामेव्याची बारीक पावडर न करता थोडे भरड कूटच ठेवावे दुध पिताना मधे-मधे दाताखाली आलेले छान लागतात.
* जायफळ पूड अगदी ऐनवेळी दूध देताना घालावी. उकळताना घातल्यास दूध फाटण्याची शक्यता असते.
* दिलेल्यापैकी फक्त कोरडे साहित्य पावडर करून बाटलीत भरून ठेवले तर एरव्ही पण हा दूध मसाला गरम दूधामधे घालून पिता येतो.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment