सुटा सुकामेवा मुले आवडीने खात नाहीत. परंतु हाच सुकामेवा, खोबरे, डिंक घालून लाडू केले तर लगेच फस्त करतात. तसेच पौष्टीक पण झाले. मी दिवाळीच्या फराळामधेही आवर्जून करते. कसे करायचे साहित्य व कृती पहा,
साहित्य :-
१) किसलेले सुके खोबरे १ १/२ वाट्या
२) खारीक पावडर १ वाटी
३) खाण्याचा डिंक १/२ वाटी
४) खसखस २ टीस्पून
४) वेलची पूड २ टीस्पून
५) जायफळ पावडर १ टीस्पून
६) सुका मेवा काप १/२ वाटी (बदाम,काजू,पिस्ते,मनुका,बेदाणे सर्व मिक्स)
७) गूळ २ वाट्या
८) शुद्ध तूप १ वाटी
९ ) डेसिकेटेड कोकोनट २ चमचे
कृती :-
प्रथम कोरड्या कढई मध्ये खसखस भाजून घ्यावी.नंतर खोबर्याचा कीस भाजावा.दोन्ही कोरड्या वस्तु भाजूनटख झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून ठेवाव्यात.
नंतर त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप गरम झाले की,थोडा-थोडा डिंक टाकून तळून त्याची लाही फुलवून घ्यावी व कडेला काढून ठेवावी. बदाम,काजू,पिस्ते तळून घ्यावेत.शेवटी राहिलेल्या तुपामध्ये खारीक पावडर भाजून घ्यावी.
वरील भाजलेली खसखस थोडी कूट करून घ्यावी.( नाही केले तरी चालते पण कुटली तर खमंग वास येतो). खोबरे व डिंक हातानेच थोडे चुरावे.
आता सर्व भाजलेले साहित्य ,सुकामेवा व जायफळ वेलचीची पूड मिसळावे, व नीट एकत्र करावे व मिश्रण तयार करावे.
दुसर्या एका भांड्यामडे गूळ घ्यावा व दोनच चमचे पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळत रहावे. गूळ वितळून वर आला की गॅस बंद करावा.(पाक करू नये) झटपट सर्व तयार केलेले कोरडे मिश्रण त्यामध्ये घालावे व नीट हलवावे. मिश्रण गरम -गरम असेपर्यंतच झटपट हव्या त्या साईजचे लाडू वळावेत व प्रत्येक लाडू वळल्यावर डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावा व कडेला ठेवावा.
हे लाडू खूप पौष्टिक असतात.बाळंतीण बाईसाठी खास बनविले जातात.त्यामुळं दूध जास्त येते.
टीप : गुळाऐवजी साखर पण वापरतात.साखरेचा एकतारी पाक बनवावा व नंतर सर्व साहित्य घालावे.पण पौष्टिकतेचा विचार करता ,उपलब्ध असेल तर गुळच वापरावा.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते

अगदी योग्य मापात आणि शब्दात कृती सांगितली आहे.खूपच छान।धन्यवाद।
ReplyDelete