साहित्य :-
* तूर डाळ २ कप
* खवलेला नारळ १ कप
* मध्यम आकाराचा कांदा १नग
* हिरवी मिरची,आलं,कोथंबिर
आवडीनुसार
* तूर डाळ २ कप
* खवलेला नारळ १ कप
* मध्यम आकाराचा कांदा १नग
* हिरवी मिरची,आलं,कोथंबिर
आवडीनुसार
कृती :-
प्रथम डाळ स्वच्छ धुवून १-२ तास भिजत घालावी.
नंतर,डाळीमधील सर्व पाणी निथळून काढून टाकावे व डाळ ,मिरची,कोथंबीर सर्व एकत्र करून ,पाणी न घालता थोडे भरडच मिक्सरवर वाटून घ्यावे.
त्यामधे बारिक चिरलेला कांदा,खवलेला नारळ व चवीनुसार मीठ घालावे.हाताने एकसारखे करून घ्यावे व हातानेच छोटी-छोटी भजी तेलामध्ये सोडून मध्यम आचेवर तळावी.
मस्त गरमा-गरम खुसखूशीत भजी तयार. हिरवी चटणी अथवा साॅस बरोबर सर्व्ह करावीत.
टिप:-
सारणामध्ये गरम तेल अथवा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही.
सारणामध्ये गरम तेल अथवा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment