शंकरपाळे फार गोड किंवा खारेही नसतात. त्यामुळे चहासोबत खायला छान लागतात. त्यातही मला पुरीसारखे फुगलेले पातळ शंकरपाळे नाही आवडत. कारण हाताळताना वरच्या फुग्याचा पार चुरा होतो व दिसायला चांगले नाही दिसत. मला हाँटेलमधे जाड, ठुसठूशीत, खुसखूषीत असतात असे आवडतात. त्यामुळे मी नेहमी तसेच बनवते. कसे करायचे साहित्य व कृती
साहित्य:-
* मैदा ३ वाट्या
* साखर १/२ वाटी
* पाणी १/२ वाटी
* तेल १/२ वाटी
* मीठ
चिमूटभर
* तळणीसाठी पुरेसे तेल
* साखर १/२ वाटी
* पाणी १/२ वाटी
* तेल १/२ वाटी
* मीठ
* तळणीसाठी पुरेसे तेल
कृती:-
प्रथम मैदा स्वच्छ चाळून एका पसरट भांड्यामधे घ्यावा व त्यामधे मीठ घालून सारखे करून घ्यावे.
दुसर्या एका भांड्यामधे पाणी, तेल व साखर एकत्र करून गॅसवर ठेवावे.ढवळत रहावे. साखर विरघळून पाणी उकळू लागले की, मैद्यामधे घालावे.नंतर हाताने मैदा मळून घट्ट गोळा तयार करावा. दहा मिनीटे झाकून ठेवावा.
आता तयार कणिकेचा एक-एक मोठा गोळा घेऊन पराठ्याप्रमाणे जाडसर पोळी लाटावी व सुरीने किंवा कातरण्याने त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्यावेत.
एका तळपाइतके झाले की गरम तेलात टाकावेत व ते तळत-तळत दुसरी पोळी लाटावी.
अशा रीतीने सर्व शंकरपाळे मंद आचेवर सोनेरी रंगावर तळावेत.थंड होऊ द्यावेत. म्हणजे खुसखूषीत होतात.नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवावे.चहा बरोबर खायला छान लागतात.
टीप्स :-
* पाण्याऐवजी दूध वापरले तर फारच खुसखूषीत होतात.निम्मे दूध व निम्मे पाणी वापरले तरी चालते.
* शंकरपाळ्यासाठी मैदा फार जूना वापरू नये.
* शंकरपाळ्यासाठी मैदा फार जूना वापरू नये.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment