दसरा झाला की,दिवाळीचे वेध लागतात.आता
दिवाळी म्हणले की फराळ आलाच.आणि फराळात लाडू पाठोपाठ चकली जास्त आवडीची .आता अशा या चकलीचे नाव निघाले की,मात्र चकलीच्या आधि करणारीच्या अंगावर काटा उभा रहतो.तिच्या प्राप्ती साठी भाजणे-दळणे-मळणे-तळणे असा चक्कर येणारा वळणांचा प्रवास असतो. एखाद्या वळणावर थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर ती रूसलीच म्हणून समजा .कधी खाणार्याच्या दातांची सत्व परिक्षा नाहीतर ,कधी कपडे वाळत घालायच्या दोरीचे रूप घेते.मग तिला लाईनवर आणण्यासाठी घाल, पाणी घाल,भाजाणी असे करत-करत परातभर चकल्यांचे विविध नमुने तयार होतात.अशी फजीति टाळायची असेल तर,भाजाणीपासून सर्व क्रिया लक्षपूर्वक कराव्यात.चकल्या बर्याच प्रकारे करता येतात.त्यापैकी भाजाणीच्या चकलीचा प्रकार खाली दिला आहे.भाजाणीची कृती या आधिच्या "चकलीची भाजाणी" या रेसिपी मधे आहेच.
साहीत्य:-
* चकलीची भाजाणी २ वाट्या
* तेलाचे मोहन ४ टीस्पून
* पाणी १ वाटी
* मिरची पूड १ टीस्पून
* मिठ १ टीस्पून
* तिळ १ टीस्पून
* ओवा १ टीस्पून
* हींग १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* तळणीसाठी तेल
* तेलाचे मोहन ४ टीस्पून
* पाणी १ वाटी
* मिरची पूड १ टीस्पून
* मिठ १ टीस्पून
* तिळ १ टीस्पून
* ओवा १ टीस्पून
* हींग १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* तळणीसाठी तेल
कृती:-
प्रथम एका पसरट भांड्यामधे भाजणीचे पीठ घ्यावे.त्यामध्ये वरील सर्व कोरडा मसाला घालावा व नीट मिक्स करावे.
नंतर तेल गरम करून (मोहन) घालावे.परत नीट मिक्स करावे.सगळीकडे पीठाला नीट चोळावे.
शेवटी पाण्यात मीठ टाकून ते विरघळून उकळलेले गरम पाणी घालून सर्व पीठ हलवून दडपून दहा ते पंधरा मिनीटे झाकून ठेवावे.
आता पंधरा मिनिटानी थोडे-थोडे पीठ घेऊन थंड पाण्याने मळावे व चकलीच्या साच्यातून चकल्या पाडाव्यात व गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात.
तळून झाल्यावर चाळणीवर काढाव्यात.पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.
टीप्स :-
* पीठ हाताने चांगले मळावे.नाहीतर चकल्या तुटतात.
* चकल्या तेलात सोडताना तेल चांगले गरम असावे,मात्र चकली तेलात सोडल्यावर गॅस थोडा कमी करावा.म्हणजे चकली न जळता पोटातून छान तळते व कुरकूरीत होते.
फार गरम तेलात चकल्या वरून करपतात व पोटात मऊ रहातात व फार गार कमी तापलेल्या तेलात टाकताच विरघळतात.म्हणून योग्य तापमान ठेवावे.
* चकलीमधे हळद घालू नये.चकलीचा रंग काळा येतो.
* पीठ हाताने चांगले मळावे.नाहीतर चकल्या तुटतात.
* चकल्या तेलात सोडताना तेल चांगले गरम असावे,मात्र चकली तेलात सोडल्यावर गॅस थोडा कमी करावा.म्हणजे चकली न जळता पोटातून छान तळते व कुरकूरीत होते.
फार गरम तेलात चकल्या वरून करपतात व पोटात मऊ रहातात व फार गार कमी तापलेल्या तेलात टाकताच विरघळतात.म्हणून योग्य तापमान ठेवावे.
* चकलीमधे हळद घालू नये.चकलीचा रंग काळा येतो.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment