23 August 2016
चिरोटे (Chirote)
"चिरोटे" हा एक पारंपरिक पक्वान्नाचा प्रकार आहे. दिवाळी फराळात करंजीच्या जोडीला हमखास बनवले जायचे. मात्र दिवाळीला फराळात जे चिरोटे केले जातात त्यावर पीठीसाखर पेरली जाते. तसेच जेवणात पक्वान्न म्हणून चिरोटे करायचे असतील तर जिलेबी प्रमाणे साखरेच्या पाकात बुडवून काढले जातात. आणि जर का आपल्याला गोड नको असतील तर खरपूस तळून झाल्यावर तसेच ठेवले तरी खारी बिस्कीट सारखे चहा सोबत खायलाही मस्त खुसखूषीत लागतात. ज्यांना जास्त गोड आवडत नाही किंवा साखर खायची नाही त्याच्यासाठी हा उत्तम प्रकार आहे. घरच्या घरी उपलब्ध सामग्रीतून बनविता येते.एकदम सहज सोपी पाककृती आहे. कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य:-
* मैदा १ १/२ वाटी
* रवा १/२ वाटी
* तूप / तेल मोहनासाठी ४-५ टेस्पून
* चिमुटभर मीठ
* दुध १/२कप
* कॉर्न फ्लोअर ४ टेस्पून + तूप २ टेस्पून
* तूप /तेल चिरोटे तळण्यासाठी
* पीठीसाखर साखर १/२ वाटी
कृती:-
प्रथम रवा आणि मैदा एका पसरट भांङ्यामधे घ्या व त्यामधे कडकडीत गरम तूप व चिमूटभर मीठ घालून एकत्र करा. सर्व पीठाला हाताने मोहन चोळून घ्या. कोरडे पीठ मुठीने दाबले तर मुटका झाला पाहीजे.
नंतर अंदाज घेत थोडे -थोडे दूध घालून घट्ट असा मिश्रणाचा गोळा भिजवा. अर्धा तास ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावा. तोपर्यंत,
दोन चमचे तुप हाताने फेटून पातळ करावे व त्यामधे काँर्नफ्लोअर घालून परत फेटून पेस्ट तयार करावी. याला 'साटा' म्हणतात.
आता अर्ध्या तासानंतर तयार पीठाचा गोळा फूड प्रोसेसर मधून किंवा मिक्सरमधे फिरवून काढावा व मऊ करून घ्यावा.
नंतर एकत्र केलेल्या पीठाचे एकाच आकाराचे सारखे भाग करावेत. ( इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या सहा पोळ्या झाल्या)
आता त्यातील तीन गोळ्याची वेगवेगळया तीन पातळसर पोळ्या लाटाव्यात .प्रत्येक पोळीला तयार साटा लावून घडी करून बाजूला ठेवावी.
आता शेवटी तिसरी लाटलेली पोळी पोळपाटावर तशीच ठेवून त्यावर साटा लावून आधीच्या घडी करून ठेवलेल्या दोन पोळ्या बरोबर एकावर एक पसराव्यात.
आता या तीनही पोळ्यांची मिळून घट्ट दाबून सुरळी करावी. तयार सुरळीचे एक-एक इंचाचे तुकडे करावेत व ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावेत.
नंतर एकेक गोळी घ्यावी व लेयर असलेली बाजू वर ठेवून हाताने दाबून गोळी चपटी करून घ्यावी व हलक्या हाताने जाङसर पुरी लाटावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे तयार करून घ्यावेत.
आता तयार झालेले चिरोटे मंद आचेवर, गुलाबी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे ताटाच्या कडेने तिरके उभे करावेत. म्हणजे तूप निथळते. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा त्यावर आवडीनुसार पीठीसाखर भुरभुरावी. मस्त खुसखूषीत चिरोटे खाण्यास तयार!
हे चिरोटे पुर्णपणे गार झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.केव्हाही मुलांना किंवा अचानक कोणी घरी आलेच तर चहासोबत बिस्कीट सारखे खायला देऊ शकतो.
टीप्स :-
* मोहन कडकडीत गरम असावे .
* पाकातील चिरोटे करायचे असल्यास साखर २ वाट्या घेऊन साखर बुडेल इतपत पाणी घालून साखरेचा गोळीबंद पाक करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चिरोट्यात पाक शोषला जावून चिरोटे मऊ पडतात. पाक सतत उबेशी ठेवावा. तळून साधारण गार, कोमट झाले की गरम पाकात बुडवून काढावेत.
* काँर्नफ्लोअर ऐवजी तांदुळाची पीठी घेतली तरी चालते. मात्र साट्याची जास्त घट्ट पेस्ट नको. पातळच असावी. अन्यथा चिरोटे खाताना तोंडात पीठ पीठ लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
सत्यनारायण प्रसाद /शिरा ( Halawa)
* साखर १ १/४ वाटी
* तूप १ १/४ वाटी
* पाणी व दुध मिक्स २ १/२ वाट्या (दोन्ही निम्मे-निम्मे )
* वेलची पावङर,ङ्राय फ्रूट्स आवङीप्रमाणे
* एका पिकलेल्या केळाचे काप
* ङाळींबाचे दाणे आवङीनूसार
केळ रवा भाजत आल्यावर घालावे.शेवटच्या दोन परतण्या द्या. काळे पडत नाही.
19 August 2016
झणझणीत कोल्हापूरी मिसळ-पाव (Misal-pav)
* खसखस १ टेस्पून
* किसून सुके खोबरे २ टेस्पून
* लवंगा चार-पाच
* दालचिनी दोन इंच
* मिरे पाच-सहा
* जिरे एक टीस्पून
* मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून
* लसूण ८-१० पकळ्या
* आले एक इंच
* तेल १०० मि.लि
* लाल मिरची पावडर आवडीनुसार
* हळद पावडर
* मीठ चवीनुसार
* मीठ घालून वाफवलेली मोडाची मटकी व उकडलेले बटाटे पाव किलो
* फरसाण
* बारीक चिरलेला कांदा
* लिंबू चिरून
* लादी पाव किंवा सॅडविच स्लाइज्ड ब्रेड
* वरून घालण्यासाठी ओले खोवलेले खोबरे व चिरलेली कोथिंबिर
प्रथम एका पॅनमध्ये तिळ,खसखस,खोबरे कोरडेच भाजावे.नंतर थोड्या तेलावर कांदा भाजावा.
१) जास्त तेलकट कट नको असेल तर तेल थोडे कमी घ्यावे.आवडीनूसार कमी-जास्त करावे.
२) मटकीची उसळ करून घेतली तरी चालते.परंतू तयार कटामधे मटकी घालू नये.कटाचा स्वाद चव बदलते. तसेच नुसता कट असेल तर दोन दीवस आरामात छान टिकू शकतो.
३) फरसाणच्या जोडीला डब्यात शिल्लक असेल तर शेव चिवडा पण घ्यावे.
08 August 2016
बेळगावी कुंदा ( Belgaon Kunda)
* डिंक १ टेस्पून
* रवा १ टेस्पून
* तूप १ टेस्पून
* दही १ टेस्पून
* दूध १/२ लिटर
* जायफळ, वेलची पावडर आवडीनुसार
04 August 2016
उपवासाचे दहीवडे (Fasting Dahivada)
उपवास आहे म्हणून काय झाले? काहीतरी सकस, पण खमंग खायला पाहीजेच ना. मग चला उपवासाचे दहीवडे बनवूया. कसे करायचे साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* शिजवलेला वरी तांदुळाचा मऊ भात १ वाटी
* भिजलेला शाबूदाणा अर्धा वाटी
* भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट २ टेस्पून
* राजगिरा पीठ २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* हिरवी मिरची पेस्ट
* तेल तळण्यासाठी
* दही
* भाजलेल्या जिर्याची पूड
कृती :-
प्रथम एका पसरट बाऊलमधे भिजलेला शाबूदाणा व वरीचा भात एकजीव करून घ्या.
आता त्यामधे दाण्याचे कूट,राजगिर्याचे पीठ, मिरची पेस्ट, थोडी भाजलेल्या जिर्याची भरड पूड व चविनूसार मीठ घालून सर्व मिश्रण हाताने एकजिव मळावे. आवश्यकता भासल्यास राजगिर्याचे पीठ कमी-जास्त करू शकता. जेणेकरून मिश्रणाचा खुटखूटीत गोळा बनवता आला पाहीजे. मिश्रण कडेला ठेवून द्या व वडे तळायच्या आधि २ चमचे दह्यामधे पाणी घालून पातळ ताक वडे बुडवण्यासाठी तयार करा.
तसेच वड्यवर घालण्यासाठी घट्ट दही घुसळून त्यामधे चविला साखर व मीठ घालून एकत्र ढवळून घ्या.
आता कढईत तेल गरम करा व आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटसर गोळे करून तांबूस रंगावर तळून टिश्यू पेपरवर काढा.
नंतर खायला देतेवेळी आधि पातळ ताकामधे बुडवा. दोन -तीन मिनिटानी पाण्यातून काढून हलकेच हाताने दाबून पाणी काढा. व सर्व्हींग प्लेट मधे ठेवा व वरून तयार केलेले घट्ट दही घाला. त्यावर मिरचीपूड व जीरपूड भुरभूरा व खायला द्या.
उपवासादिवशी असे थंड दहीवडे खायला खूपच छान लागतात. तेलकटही वाटत नाही. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील.
टीप्स -
१) वरीचा भात एकदम मऊ शिजवलेला असावा.
२) राजगिर्याच्या ऐवजी शिंगाडा पीठ किवा दोन्ही पीठ एकत्र घालू शकता.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
खिचडा ( Masala Rice with Sprout)
साहीत्य :-
* मोड आलेली मिश्र कडधान्ये १ वाटी
* बासमती तांदुळ १ वाटी
* ओले खोबरे १ वाटी
* लवंगा
* दालचिनी
* शहाजिरे
* गोडा मसाला २ टीस्पून
* मिरची, कढीपत्ता
* कोथंबिर
* मीठ चविनूसार
* तेल २ टेस्पून
* हींग, मोहरी, हळद
* पाणी गरजेनुसार
कृती :-
प्रथम कुकरमधे तेल घालून ही, मोहरी, हळद फोडणी करा. फोडणी तडतडल्यावर त्यामधे मिरची, कढीपत्ता व लवंग, दालचिनी शहाजिरे घाला.
नंतर त्यामधे कडधान्ये व तांदुळ घाला. थोडे परतून, त्यामधे गोडा मसाला व मीठ घाला. ओले खोबर, कोथंबिर घाला. परत थोडे परतून एकत्र करा.
शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घाला व झाकण बंद करून ४-५ शिट्ट्या काढा. (कडधान्ये शिजायला वेळ लागतो.)
आता वाफ जिरल्यावर डिशमधे काढा वरून खोबरं कोथंबिर व तूप घाला. व गरमा-गरमच सर्व्ह करा.
रात्रीच्या जेवणात फारशी भूक नसते पण थोडेफार खाण्याची इच्छा असते व काही जास्त करण्याचा कंटाळा आलेला असतो. अशावेळी हा खिचडा वन डिश मिल म्हणून उत्तम पर्याय आहे. तूम्हीही करून बघा. नक्की आवडेल.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
03 August 2016
उपवासाचा ढोकळा (Fasting Dhokala)
* वरी तांदुळ १ वाटी
* शेंगदाणे कूट १/२ वाटी
* आंबट ताक
* मीठ, चविनुसार
* हिरवी मिरची, आले पेस्ट
* फ्रूटसाँल्ट इनो एक टीस्पून
इडली ढोकळा (Idly Dhokala)
* डाळीचे पीठ २ वाट्या
* रवा १ वाटी
* आंबट दही किंवा ताक १ वाटी
* पाणी गरजेनुसार
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर
* हींग चिमूटभर
* हळद
* हिरवी मिरची व आल्याची पेस्ट १टीस्पून
* इनो फ्रूटसाँल्ट दीड ११/२ टीस्पून
* कढीपत्ता, कोथिंबिर व एक हिरवी मिरची
* फोडणीसाठी तेल व हींग, मोहरी, तिळ
01 August 2016
उपवासाची भजी (Pakoda)
उपवास असला की हमखास चटपटीत काहीतरी खावे वाटते. अशावेळी ही एकदम सोपी व पट्कन होणारी भजी करा. साहीत्य व कृती,
साहित्य :-
* बटाटे २
* राजगिर्याचे पीठ अर्धा वाटी
* आरारूट पावडर १ टेस्पून
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड /हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* जीरे पूड
* तेल तंळणीसाठी
कृती :-
प्रथम बटाटे साल काढून पातळ गोल चकत्या करा व नंतर त्या चकतीच्या उभ्या बारीक स्ट्रिप कापा. (उभ्या चिरलेल्या कांद्याप्रमाणे दिसतील)
नंतर त्यावर मिरचीपूड, मीठ व जीरपूड घालून चोळा व दहा मिनिट झाकून ठेवा.
दहा मिनिटानी बटाट्याला पाणी सुटलेले असेल, आता त्यात राजगिरा पीठ व आरारूट घाला व एकत्र करा. गरजेनुसार राजगिरा पीठ कमी -अधिक करा. मिश्रण सुटसूटीत झाले पाहीजे. साधारण कांद्याची खेकडा भजी करतो त्याप्रमाणे असावे.
आता गरम तेलात हाताने लहान लहान भजी सोडा व कुरकुरीत तळा.
मस्त कुरकुरीत भजी नुसतीच अथवा चटणी सोबत खा.
टीप :- आरारूट पावडर नसेल तर बाईंडींग साठी शिंगाडा पीठ वापरले तरी चालते.
चकत्या जितक्या पातळ कापला येतील तितक्या पातळ कापा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
25 July 2016
डाळ ढोकळी(Dal Dhokali)
डाळ
* तूर डाळ १ वाटी
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
*,गरम मसाला १ टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* गूळ सुपारी एवढा
* हळद, हींग, मोहरी, जीरे
* कढीपत्ता
* कोथंबिर, ओलं खोबरं
* तूप वरून घालण्यासाठी
* तेल फोडणी साठी
* पाणी
ढोकळी
* गव्हाचे पीठ २ वाट्या
* चणाडाळ पीठ १ टेस्पून
* हळद
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* ओवा चिमूटभर
* मीठ चवीनुसार
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* मोहन तेल २ टीस्पून
* पाणी
20 July 2016
आलू काँर्न पराठा (Aloo Corn Paratha)
सकाळच्या नाष्ट्याला किंवा मुलांना शाळेच्या डब्यात देण्तासाठी अत्यंत उत्कृष्ट,पोटभरीचे व पौष्टीक असे हे पराठे आहेत. कसे करायचे साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* गव्हाचे पीठ १/२ वाटी
* ज्वारीचे पीठ १/२ वाटी
* उकडलेला बटाटा किसून १/२ वाटी
* ओले मका दाणे वाटून १ वाटी
* मिरची, आलं, लसूण पेस्ट
* पूदीना पेस्ट १ टीस्पून
* कोथंबिर
* काळीमिरी भरड चिमूटभर
* मीठ चविनूसार
* तेल किंवा तूप भाजण्यासाठी
कृती :-
प्रथम सर्व साहीत्य एकत्रित करून मळा. पाणी न वापरताच मळा गरज वाटली तर किंचित घ्या. मळून तेल लावून दहा मिनिट झाकून ठेवा.
नंतर भाकरी प्रमाण हातानेच जाडसर थापून ल सोडून खरपूस भाजा व गरम गरम, पराठे लोणी,लोणचे किवा साँस सोबत खायला द्या.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
09 July 2016
गुलकंद बर्फी (Gulakand Burfi)
गुलकंदाचे,गुलकंद लस्सी, गुलकंद फालुदा असे बरेच प्रकार करतात. शरिरात उष्णता वाढली असेल तर गुलकंद व दूध घेतले जाते. अशा गुणी गुलकंदाची मी बर्फी केली, साहित्य व कृती,
साहित्य :-
* गुलकंद १/२ वाटी
* साखर १ १/२ वाटी
* ओले खोबरे खवून २ वाट्या
* मिल्क पावडर १/४ वाटी
* तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी
कृति :-
प्रथम एक जाड बुडाची कढई किंवा पातेले घ्या व साखर, खोबरं एकत्र करून शिजत ठेवा. तळाला लागणार नाही याची काळजी घेउन सतत हलवत रहा.
नंतर मध्यावर आले की,गुलकंद मिसळा व हलवत रहा.
आता मिश्रण कडेने सुटायला लागले व गोळा झाले की मिल्क पावडर घालून हलवा व तूप लावलेल्या ताटात गोळा काढा.
वाटीने किंवा प्लास्टिक कागद वर घालून हाताने मिश्रण थापून सारखे करा. वर सुरीने आडव्या -उभ्या रेषा मारून ठेवा.
गार झाल्यावर वड्या काढा. गुलकंद बर्फी खूप सुंदर चवीची लागते. तूम्हीही करून बघा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
08 July 2016
पडवळाची भजी ( Snakegourd Pakoda)
साधारणपणे भजी म्हटले की, सर्वात आधि कांदाभजीच आपल्या डोळ्यासमोर येतात. पण इतर बर्याच भाजांची पण भजी होतात व तितकी च सुंदर लागतात. जसे कोथंबिर मेथी,अळू, पालक, शिमला मिरची, घोसाळी भजी करतात. तसेच आज पडवळाची भजी केली. खूपच छान लागतात. कशी केली साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* पडवळ २०० ग्रँम
* डाळीचे पीठ आवश्यकते नुसार
* तांदुळाचे पीठ १ टेस्पून
* लाल मिरची पूड आवडीनुसार
* मीठ चविनूसार
* हींग, हळद
* तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम पडवळ स्वच्छ धुवून, आतल्या बिया,गर काढून टाका. नंतर त्याचे गोल काप करा. आता कापांवर पाण्याचा हबका मारा व हाय टेम्परेचरला ओवनला दीड मिनिट वाफवून किंचित मऊ करून घ्या. फार मऊ शिजवायचे नाही.
आता बाऊलमधे डाळीचे व तांदुळाचे पीठ एकत्र करा. त्यामधे तिखट, मीठ, हळद, हींग घाला व एकत्र करा. आवश्यक तितके पाणी घाला व दाटसर घोळ तयार करा.
आता आधि तयार पडवळाचे काप पीठाच्या घोळात बुडवून गरम तेलात तळून काढा. गरमा-गरम कुरकुरीत भजी गरम असेपर्यंत खायला द्या. आवडीनुसार सोबत साँस, हिरवी चटणी घ्यावी. अथवा नुसतेसुध्दा छान लागतात.
तूम्हीही करून बघा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
04 July 2016
दडपे पोहे (Dadpe Pohe)
दडपे पोहे हा एक महाराष्ट्रीयन नाष्ट्याचा पदार्थ आहे. कांदा पोहे, उपमा हे पदार्थ कसे गरमा-गरम खावे लागतात तर अधिक चवदार लागतात. तसे याचे नसते हे थंडच खातात. त्यामुळे जास्त सोईचे होते.छोटेसे पिकनिक असेल तरी डब्यात नेणे सोईचे आहे. तर कसे करायचे साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* पातळ पोहे २ वाट्या
* ओलं खोबरं १/२ वाटी
* मीठ चविनूसार
* साखर १/२ लहान चमचा
* मेतकूट २ टीस्पून
* भाजलेले/तळलेले शेंगदाणे
* तळणीची मिरची १ किंवा हिरवी मिरची तुकडे
* कांदा बारीक चिरून १
* कोथंबिर, लिंबू
* फोडणी साहीत्य मोहरी, जीरे, हींग,हळद
* तेल २ टेस्पून
कृती :-
प्रथम पोहे चाळून, निवडून एका पसरट भांड्यात घ्या. त्यावर मीठ, साखर, मेतकूट घाला.
आता तेल गरम करून फोडणी करून घ्या. फोडणीमधे निम्मा कांदा, कढीपत्ता, मिरची घालून भाजा व तयार फोडणी थंड होऊ द्या.
आता थंड केलेली फोडणी पोह्यावर घाला व हाताने व्यवस्थित पोह्याना चोळा.
शेवटी शिल्लक अर्धा कांदा, ओलं खोबरं, लिंबू, कोथिंबिर व भाजलेले/ तळलेले शेंगदाणे घाला परत एकदा हातानेच एकत्र करा. पोहे तयार!
तयार पोहे वरून शोभेला खोबरं, कोथिंबिर घालून खायला द्या.
टीप: या पोह्यामधे आवडीनुसार कांद्याऐवजी किंवा सोबत काकडी कोचून, कोबी बारीक चिरून सुध्दा घातले तरी चवदार लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
01 July 2016
मेदूवडा (Meduvada)
आजकाल सर्वच प्रांतातील लोक आवडीने दुसर्या प्रांतातील एकमेकांचे पदार्थ करतात. तसेच हा मेदूवडा मुख्यतः साउथ इंडियन पदार्थ आहे. पण सगळीकडे केला जातो. कसा करायचा साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* उडीद डाळ २ वाट्या
* ओल्या खोबर्याचे पातळ काप आवडीनुसार
* मिरपूड भरड ७-८ मिर्याची
* मीठ चविनूसार
* कढीपत्ता ७-८ पाने चिरून
* हिरवी मिरची बारीक चिरून
* आलं किसून
* तेल तळण्यासाठी
कृती -
प्रथम डाळ तीन-चार वेळा धुवून घ्या. नंतर ५-६ तास भिजत घाला. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये.
मिक्सरमधून मिश्रण एका खोलगट बाऊलमधे काढावे. हे मिश्रण शक्यतो हातानेच फेसावे, म्हणजे हाताने थापटी देउन बोटांनी मिश्रण वर उचलावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटल तरी चालते . यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, नंतर मिरे, खोबर्याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.
आता आधी हात ओला करावा, म्हणजे हाताला मिश्रण चिकटत नाही. व लिंबाएवढे मिश्रण हातात धेऊन वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडावे. खरपूस तळावे.
टीप :- तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस हायवरच,मोठा ठेवावा. अन्यथा वडे तेलकट होतात.
मिश्रण भरपूर फेटावे. वडे हलके होतात.
मिश्रण फार घट्ट वाटले तर थोडे पाणी घाला. नाहीतर वडे पोटात घट्ट होतात.
फार पातळ झाले तर तांदुळाचे पीठ घाला. कुरकुरीत पण होतात.
डाळ तिचे पांढरे चिकट पाणी जाईपर्यत 3-4 वेळा अवश्य धुवा. त्याने वडे हलके होण्यास मदत होते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
22 June 2016
रवा आम्लेट( Rawa Omelette)
* बारीक रवा २ वाट्या
* चणाडाळ पीठ २ टेस्पून
* तांदुळाचे पीठ १ टेस्पून
* आंबट दही अर्धी वाटी
* बारीक चिरून कांदा १
* बारीक चिरून टोमँटो १
* कोथंबिर, कढीपत्ता
* बारीक चिरून हिरवी मिरची आवडीनुसार
* मीठ चविनूसार
* तेल
* पाणी गरजेनुसार
19 June 2016
कच्चे केळ कटलेट (Banana Cutlet)
उपवास आहे म्हटले की, हमखास त्यादिवशी काहीतरी चटपटीत खावे वाटते. पण असे चटपटीत पदार्थ खाताना तब्येतीचीही काळजी घ्यावी लागते. उपवासा दिवशी जास्त तेलकट, तिखट पदार्थ घशाशी येतात. तेव्हा तब्येत सांभाळून, चटपटीत पण पौष्टीक कटलेट करू.साहीत्य व कृती -
साहीत्य :-
* कच्ची केळी ४ नग
* बटाटे २
* शिंगाडा पीठ २ टेस्पून
* जीरेपूड १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* तेल
कृती :-
प्रथम केळी व बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर दोन्ही साल काढून मँश करून घ्या.
आता मँश केलेल्या लगद्यामधे शिंगाडा पीठ व मीठ, मिरची, जीरेपूड घाला व चांगले मळा.
आता तयार मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घ्या व हाताने साधारण चपटा आकार द्या. फ्रायपँनमधे थोडे -थोड़े तेल घालून शॅलोफ्राय करा.डीपफ्राय केले तरी चालते.
भाजलेल्या दाण्याच्या कुटामधे चिमूटभर मीठ, लाल मिरचीपूड व दही घालून चटणी तयार करा व तयार कटलेट सोबत द्या.
टीप: जर उपवास नसेल तर, शिंगाडा पीठाऐवजी काॅर्नफ्लोअर घातले तरी चालते.
तसेच आवडत असेल तर लसूण,आलं पेस्टही घालावे. सोबत टोमँटो साँस द्यावे.
केळी व बटाटे एकत्र उकडू नये. कारण केळी उकडायला बटाट्यापेक्षा कमी वेळ लागतो. व केळी एकदम मऊ होण्याची भिती असते. तसेच दोन्हीही २ तास आधी वाफवलेले असले किंवा आदले दिवशी उकडून फ्रिज मधे ठेवलेले असले तर जास्तच चांगले. म्हणजे मिश्रण चिकट होत नाही व कटलेट खुसखूषीत होतात.
मी ओवनला हाय टेम्परेचर वर केळी दीड मिनट व बटाटा 3 मिनट उकडला.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
13 June 2016
कोबी पकोडा (Cabbage Pakoda)
कोबीची भाजी म्हटले की बरेचवेळा नाक मुरडले जाते. पण मंडईत उपलब्ध असणार्या भाज्या व्यतिरीक्त वेगळ्या भाज्या तरी काय आणणार? तरी त्याची वेगवेगळ्या प्रकारांनी भाजी तर कधी पराठे, कोशिंबिर असे प्रकार केले जातात. आज कोबीचे पकोड़े काढले. मस्त झाले. कसे केले साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* लांब व बारीक चिरून कोबी २ वाट्या
* चणाडाळ पीठ गरजे नुसार. अंदाजे १/२ वाटी
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* कोथंबिर
* मीठ, हळद, हींग
* धना-जिरा पावडर
* तळणीसाठी तेल
कृती :-
प्रथम चिरलेला कोबी एका बाऊलमधे घेऊन त्यावर मीठ व हळद घालून चोळा. तसेच १० मिनिट झाकून ठेवा.
आता १० मिनिटानंतर त्याला पाणी सुटलेले असेल, त्यात मावेल इतकेच डाळीचे पीठ घाला.आंल -लसूण,मिरची पेस्ट, चिरून कोथंबिर, धना-जीरा पावडर, हींग सर्व घाला. हलक्याच हाताने नीट मिक्स करा.
गरम तेलात कांदाभजी प्रमाणे तळून काढा. मस्त कुरकुरीत पकोडे गरम-गरम सर्व्ह करा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
06 June 2016
मँगो हलवा (Mango Halawa)
अंबा फळांचा राजा!वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे भाव पण जादा खातों.महीनाभर मनसोक्त खाल्ला जातो. तरीही त्याचे परतायचे दिवस आले की,थोडे वाईटच वाटते. मग वर्षभर चाखता यावा म्हणून मुरांबा, जाम, छुंदा करून ठेवला जातो. तसेच अंब्याची पोळी, साठा असेही केले जाते. मी तर शेवटी -शेवटी आम्रखंड, आंब्याच्या वड्या, आईस्क्रिम, फालुदा, मँगो शेक असे बरेच अंब्याचे पदार्थ एकदा एकदा करतेच. आज 'आंब्याचा शिरा' केला. कसा केला साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* रवा १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १/२ वाटी
* पाणी १ वाटी
* आंब्याचा रस १ वाटी
* वेलचीपूड
* काजू सजावटीला
कृती :-
प्रथम कढईत तूप गरम करावे व रवा छान गुलाबी भाजून घ्या.
आता गरम पाणी घाला. हलवत-हलवत च अंब्याचा रस घाला. मोकळे होईपर्यंत हलवत रहा.
शेवटी साखर घाला. गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन साखर विरघळे पर्यंत हलवत रहा.
शेवटी गँस बंद करून वेलचीपूड घाला. खायला देताना वरून तूप एक चमचा सोडा व काजू घालून गरम खायला द्या.
त्याचा रंग व स्वाद इतका सुंदर आहे की बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटते. तूम्हीही करून बघा. नक्की आवडेल.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.





