25 May 2015
आंबा वडी (Mango Burfi)
* साखर ४ वाट्या
* आंब्याचा रस २ वाट्या(मध्यम २ आंब्यांचा)
* वेलचीपूड
* मिल्कपावडर २ टेस्पून
* पिठीसाखर २ टेस्पून
* तूप १ टीस्पून
21 May 2015
आंबा आईसक्रिम (Mango Ice-cream)
१. ताजा आंबाचा रस/गर १कप
२. पीठीसाखर १ कप
३. थंड व्हिपिंग क्रीम १ १/२ कप
४. मॅगो इसेंन्स १ टीस्पून ऐच्छीक
19 May 2015
कलिंगड ज्यूस (Watermelon Juice )
कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातिल पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळाचे अजून बरेच काही फायदे व उपयोग आहेत. कोणतेही फळ शक्यतो चिरूनच खावे. परंतू काहीवेळा वृध्द,लहान आजारी माणसांना रस काढून देणे आवश्यक असते .तर कसा काढावा ते पहा -
* प्रथम कलिंगड चिरून त्यातील बिया काढून लहान फोडी करून घ्या. फोडी करताना त्यातील फक्त लाल भागच घ्यावा.रस पण छान लाल व गोड होतो.
* नंतर मिक्सर किंवा ब्लेडरमधे पाणी न घालता फोडी घुसळाव्यात. घुसळताना त्यामधे एक-दोन टेस्पून गुलकंद घालावा .म्हणजे गोडीपण वाढते व उन्हाळ्यात गुलकंद थंड असतो शरीराला.
* नंतर तयार रस मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावा व त्यामधे आवडीप्रमाणे सैधव मीठ व चाट मसाला घालावा.
* आता छानश्या ग्लासमधे घालून सजावटीला वरून पुदीन्याची पाने ,एखाद दुसरा कलिंगडाचा लहान तुकडा व आईसक्यूब घालून सर्व्ह करा.
टीप :- या ज्यूसमधे आपण बरीच विविधता आणू शकतो. गुलकंदा ऐवजी पुदीन्याची पाने , तर कधी तुळशी , रूहअब्जा कधी लिंबू पिळावे.
जर बर्फ चालत नसेल तर आधीच कलिंगड चिरून गार होण्यासाठी फ्रिजमधे ठेवावे.नंतर रस काढा.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
16 May 2015
व्हेजिटेबल स्टाॅक (Vegetable Stock)
बरेच वेळा असे होते आपल्याला भाजीचे सूप करायचे असते. पण सर्वच भाज्या घरात ऐनवेळी उपलब्ध असतील असे नाही. मग भाज्या आणून सूप करणे म्हणजे कटकटीचे व किचकट काम वाटते.म्हणून हा स्टाॅक तयार असेल तर आपण कोणतीही उपलब्ध भाजी घालून सूप पट्कन तयार करू शकतो.. तर स्टाॅक म्हणजे सर्व भाज्या शिजवून त्यांचा काढलेला अर्क ! तर कसा करायचा पहा.
साहीत्य :-
1) कोबी,सिमला मिरची,गाजर,फ्लाॅवर,मटार ,लाल भोपळा या सर्व किवा आपल्या आवडीच्या अजून काही भाज्या मिळून 500 ग्रॅम
2) कांदा एक
3) लसूण 3-4 पाकळ्या
4) आले एक इंच
5) मिरे 8-10
6) तमालपत्र दोन लहान पाने
7) लवंगा 3-4
8) पाणी दोन लिटर
कृती :-
सर्वात आधि पाणी गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामधे वरील सर्व मसाला टाका. पाणी गरम होईपर्यंत वरील सर्व भाज्या मोठ्या-मोठ्या कापून एक एक करून गरम पाण्यात टाका.
सर्व भाज्या पाण्यात 25-30 मिनिटे चांगल्या उकळू द्याव्यात.
नंतर सर्व भाज्या तशाच थंड होऊ द्याव्यात. गार झाल्यावर मोठ्या गाळणीतून सर्व भाज्या गाळाव्यात. आता जो अर्क निघाला आहे तो एका बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावा. जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरा.कोणत्याही भाजीचे झटपट सूप तयार करता येते.आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून व स्टाॅक वापरून विविध प्रकारची सूप्स तयार करता येतात.
हा स्टाॅक 8-10 दिवस आरामात टिकू शकतो. जास्तच रहातो पण शक्यतो आठ आठ दिवसांचा करून ठेवावा.
टीप :- भाज्या गाळून घेतल्यावर वर ज्या भाज्या रहातात त्या सत्वविरहीत असतात पण टाकायचे नसेल तर त्यात आणखी थोड्या भाज्या वापरून पावभाजी ,कटलेट किवा मॅश करून थोडे गहूपीठ वापरून पराठे बनवू शकतो.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
13 May 2015
मिश्र भाज्यांचे सूप (Mix Veg soup)
2) कोबी अर्धी वाटी
3) फ्लाॅवर अर्धीवाटी
4) गाजर 1
5) मटार दाणे पाव वाटी
6) बटर 1 टीस्पून
7) 7-8 काळ्या मिर्याची भरड पूड
8) मीठ चवीला
9) भाजीचा स्टाॅक 4 कप
10) गव्हाचे पिठ 1-1/2 टेस्पून
चिरमुर्याचे भडंग/चिवडा ( Chiwada )
चिरमुर्याचे भडंग हा अगदी सोपा व काॅमन प्रकार आहे .घरोघरी आपापल्या चवीने व पध्दतीने बनविला जातो.फक्त चिरमुरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. संध्याकाळच्यावेळी चहासोबत तोंडात टाकणेसाठी किवा मुलांना येता-जाता खाण्यासाठी आपण करतो.पट्कन होणारा प्रकार आहे तसेच तेलकट नसतो,पचायला पण हलका असा हा चिवड्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मी जास्त विस्तारपुर्वक रेसिपी देत नाही . मात्र बरेच वेळा त्यात घातलेले शेगदाणे ,खोबरे जळते, कडीपत्ता , लसूण करपतो.चिरमुरे किवा पोहे एकीकडे पिवळे तर दुसरीकडे पांढरे रहाते ,मीठ साखर,मसाला सगळीकडे नीट लागत नाही .असे काही होऊ नये म्हणून कांही टीप्स देते.
* तेल, मोहरी तडतडण्याइतकेच गरम करा. तेलातून धूर निघेपर्यत गरम नको.म्हणजे मोहरी,जिरे,तिळ न जळता फोडणी छान खमंग होते.
* फोडणी तडतडल्यावर त्यामधे सर्वात आधि शेंगदाणे घाला मंद गॅसवर तळत रहा.थोडेसे अर्धे-कच्चे तळले की मग खोबरं काप घाला .कारण खोबरे कमी वेळात तळते व शेगदाणे जास्त वेळ लागतो.मग लसूण अर्धवट ठेचून टाका.सतत हलवत रहा. सर्व गुलाबी रंगावर झाले की आता गॅस चक्क बंद करा. पुढच्या वस्तू तळायला आहे तेवढा तेलाचा व कढईचा गरमपणा पूरे होतो.
* आता अनुक्रमे फुटाणा डाळं ,कडीपत्ता ,हिरवी मिरची तुकडे टाका.हलवत रहा.हे सर्व न जळता छान कुरकूरीत होते व कडीपत्त्याचा रंग हिरवाच रहातो व छान वास येतो.
*आता सर्व तळून झाले की गॅस बंदच ठेवून आरामात लाल तिखट पूड ,हळद ,हींग,साखर , मीठ ,मेतकूट किवा धनाजिरा पावडर तयार फोडणीत टाका .जळत नाही रंग चांगला येतो व मीठ साखर विरघळते व सगळीकडे लागते . आता चिरमूरे किवा पोहे घाला. आणि व्यवस्थित हलवा की, जेणेकरून सर्व मीठ मसाला तिखट चिरमुर्याना लागेल.
*आणि आता सर्वात शेवटी कढई परत गैसवर ठेवा व एकदम मंद गैस ठेवा व पंधरा मिनिटे मधून मधून हलवत रहा की खाली लागणार नाही .किवा दुधाखाली ठेवतात ती जाळीची प्लेट असेल तर ठेवा व परतत रहा.छान कुरकूरीत व खमंग होते
* आता ते गार होईपर्यंत कढईतच राहू दे.नंतर गार झाल्यावर डब्यात भरताना आधि त्यातील कडीपत्ता मिरची हाताने चूरडून टाकावे म्हणजे खाताना मधे येत नाही ,चव पण लागते व काढून टाकले जात नाही सर्वेच खाल्ले जाते.
अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून भडंग किवा कोणताही चिवडा केला तर छान खमंग चव व रसरशीत रंग येतो. नाहीतर जळके दाणे,खोबरे तोंडात कडू लागतेय ,काळा करपलेला कडीपत्ता काढून टाकतात ,लसूण दाताखाली आला तर जळका नाहीतर कच्चाच लागतोय , रंगपण हळद ,तिखट करपून काळापट व एकीकडे पांढरे,पिवळे चिरमुरे असा रंगबिरंगी दिसते.म्हणून थोडेसे लक्षपूर्वक करावे व आरामात अशा खमंग कुकूरीत भडंगाचा आस्वाद घ्यावा.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
30 April 2015
सांडगी मिरची (Stuffed Dried Chilly)
2) धणे 2 वाटी (200 gm)
3) मोहरी 1/2 वाटी, जीरे 1/4 वाटी
4) तिळ 1/4 वाटी
5) मेथी दाणे 2 टेस्पून
6) हींग 2 टीस्पून
7) मीठ 3 टेस्पून
8) हळद पावडर 2 टीस्पून
कापावे व पोटात उभ्या चिराव्यात. आरपार चिरू नये आत मसाला भरता आला पाहीजे.
27 April 2015
दम आलू ( Dum Aloo)
साहित्य:-:-
१) बेबी आलू १०-१२
२) मोठे लाल टोमॅटो २
३) मोठे कांदे २
४)हिरवी मिरची २-३
५) लसूण १०-१२ पाकळ्या
६) लाल मिरची ५-६
७) कोथिंबीर
८) काजू १/४ कप
९) बडीशेप १टीस्पून
१०) मीठ ,साखर चविसाठी
११) फोडणीसाठी तेल २ टेस्पून,लवंगा ४ ,वेलदोडे २ ,दालचीनी १ इंच व हळद
१२ ) फ्रेश क्रीम १/२ वाटी
कृती :-
प्रथम बटाटे साल निघण्या इतपत उकडून घ्यावेत . फार मऊ नको .
बटाटे उकडेपर्यंत फोडणीचे साहित्य व फ्रेश क्रीम सोडून बाकीचे वरील सर्व साहित्य मिक्सर वर वाटू घ्या .
आता उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून काटे चमच्याने टोचून थोडी भोके पाडा. व नंतर तांबूस तळून घ्या .
नंतर पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग , दालचीनी, वेलदोडे टाका व त्यावर तयार पेस्ट घाला . तेल सुटेपर्यंत छान परता .
आता परतलेल्या पेस्ट मध्ये गरजे पुरते पाणी घालावे. फार पातळ नको . ग्रेवी दाट असावी . मीठ ,साखर घालून एक उकळी येऊ द्यावी .
शेवटी तळलेले बटाटे ग्रेवी मध्ये सोडावेत . परत एक उकळी येऊ द्यावी . दम आलू तयार .
डिश मध्ये काढून वरून फ्रेश क्रीम व कोथिंबीर घालून ,गरमा-गरम फुलके किवा पराठया सोबत खायला द्या .
25 April 2015
चाॅकलेट बाॅल (Chocolate Ball )
सुट्टी लागली म्हणले की मुले दिवसभर घरात असतात. त्यामुळे त्यांना ठराविक वेळी नुसते जेवण देऊन भागत नाही व ती नीटसे जेवत पण नाहीत.कारण सारे लक्ष खेळणे व मस्ती यातच असते. त्यामुळे सतत काही ना काही वरचे खायला लागते.मग सारखे वेगवेगळे काय द्यावे ?हा प्रश्नच असतो. मग अशावेळी झटपट होणारे व पौष्टीक असे 'चाॅकलेट बाॅल' ट्राय करा.
ही रेसिपी करण्यासाठी गॅस ची अजिबात गरज पडत नाही. कसे करायचे पहा-
साहीत्य :-
1) कोको पावडर 1/2 वाटी
2) मिल्क पावडर 1वाटी
3) पाच-सहा मारी बिस्कीट्स चा चूरा 4 टेस्पून
4) काजू,बदाम,अक्रोड ची भरड 2 टेस्पून
5) बटर 1 टीस्पून
6) गरम दूध गरजेनुसार (साधारण पाव कप लागेल)
7) डेसिकेटेड कोकोनट 2 टेस्पून
कृती :-
प्रथम मारी बिस्कीट्स मिक्सर मधून चुरा करून घ्यावित.
आता एका बाऊल मधे तयार चुरा व कोको पावडर,मिल्क पाडर, ड्रायफ्रूट पावडर आणि बटर सर्व एकत्र करून हातानेच एकसारखे करावे.
नंतर एका वाटीत गरम दूध घेऊन अंदाज घेत घेत वरील मिश्रणात घालावे . कणिकेसारखा गोळा झाला की थांबावे.
तयार मिश्रणाचे टेनिस बाॅल च्या आकाराचे लहान-लहान गोळे करून डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत.
चाॅकलेट बाॅल तयार ! मुलांना पाच वाजताच्या दूधासोबत द्या. किवा नुसतेच द्या तरी चालते दूध ,बिस्कीटे ,ड्रायफ्रूट्स सर्वच पोटात जाते. आणि थोडा वेगळा प्रकार असल्याने व पट्कन हातात घेऊन पळण्यासारखा असल्याने लगेच पसंतीस उतरतो.व आपल्याला करणेसही सोपा !!
15 April 2015
केळाच्या पुर्या (Banana Puri)
2) कणिक आवशक्यतेप्रमाणे अंदाजे २-३ वाट्या लागते
3) वेलचीपूङ
4) तेल तळणीसाठी
5) पिठीसाखर दोन टे.स्पून
14 April 2015
मेतकूट ( Metakut )
* उडद डाळ अर्धी वाटी
* तांदुळ पाव वाटी
* मेथी १/४ टीस्पून (ऐच्छिक)
* मोहरी १ टीस्पून
* धणे २ टीस्पून
* जीरे २ टीस्पून
* लवंगा ४ नग
* दालचिनी एक इंच
* काळी मिरी २-३
* लहान वेलची ३-४
* मोठी वेलची १-२
* सुंठ एक इंच
* हळद व लाल मिरची पावडर एक टीस्पून ऐच्छिक
* हींग १० ग्रॅम
टीप- असे अगदी कमी प्रमाणात करायचे असेल तर एखादेवेळी डाळी, तांदूळ नाही धुतले तरी चालते. परंतु जास्त प्रमाणात करायचे असेल तर डाळ,तांदुळ जरूर धुवून, पंख्याखाली सुकवून नंतर भाजाव्यात.
09 April 2015
कैरीची लाल चटणी ( Red Chutney)
* कैरी एक मध्यम आकाराची
* तेवढाच एक कांदा
* दाण्याचे कुट दोन टेस्पून
* गुळ लिंबा एवढा -कैरीच्या आंबटपणा नुसार कमी-अधिक करावा
* लाल मिरची पूड आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* तेल,हींग,मोहरी,हळद फोडणीसाठी
07 April 2015
क्रिस्पी मसाला भेडी ( Crispy Masala Bhindi)
* काॅर्नफ्लोर, चनाडाळ पिठ व तांदुळ पिठ प्रत्येकी 2 टेस्पून
* तिखट,मीठ चवीनुसार
* चिमूटभर आमचूर पावडर
* जीरा पावडर अर्धा टीस्पून
* तेल तळण्यासाठी
31 March 2015
आंबे डाळ/ कैरी डाळ ( Mango Dal)
उन्हाळ्याची चाहूल लागली की मला थंडगार वाळ्याचं माठातलं पाणी, कैरीचं गारेगार पन्हं, चमचमीत आंबा डाळ, कैरी बारीक चिरून केलेलं तात्पुरतं ताज लोणचं, हे लहाणपणीचे सर्व आठवू लागते.चैत्र लागला की,चैत्रातले हळदी-कुंकू एखाद्या मंगळवारी ,शुक्रवारी केले जाते. तेव्हा खास कैरीचे पन्हे व आंबा डाळ करतात. अतिशय रूचकर लागते.अशी आंबेडाळ किवा डाळीची कोशिंबीर कशी करायची व साहीत्य काय ते पहा.
साहीत्य :-
1) चणाडाळ, 2 वाट्या (2-3 तास भिजवलेली) 2) मध्यम एक कैरी साल काढून किसून,
3) हिरव्या मिरच्या 2-3
4) मीठ साखर चवीनुसार,
5) बारीक चिरलेली कोथिंबीर,
6) रिफाईंड तेल, मोहरी ,जिरे, हळद, हिंग,मेथीदाणे फोडणीसाठी, दोन लाल सुक्या मिरच्या. कडीपत्ता
कृती:-
प्रथम भिजवलेली डाळ जाडसर कुटावी. खलबत्यात कुटली तर जास्त चांगली होते.रद्दा होत नाही.नाहीतर आजकाल मिक्सर मधे करतातच पण अवल-चवल अशी भरड ठेवा.
कुटताना पाव चमचा जिरे,मीठ,मिरची व साखर सर्व घालून कुटावे. म्हणजे नीट मिक्सही होते.
नंतर त्यात किसलेली कैरी व कोथिंबीर घालून नीट कालवून घ्यावी.
आता तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे,मेथी, हिंग, लाल मिरच्या,कडीपत्ता घालून फोडणी करावी. शेवटी हळद थोडी जास्त घालावी.
ही फोडणी गार करून डाळीत मिसळावी व डाळ नीट कालवून घ्यावी.
सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरावी. ही डाळ जेवणात पण कोशिंबीर म्हणून वाढता येते व नुसतीसुध्दा बशीत घेऊन खातात.परंतू चना डाळ पचायला जड असते व त्यात आंबे डाळ कच्चीच असते.त्यामुळे आपले प्रकृतीमान संभाळून खावी.
टीप:-कैरीचा आंबटपणा पाहून प्रमाण कमी-जास्त करावे.
ही माझी रेसिपी २ मे २०१५ महाराष्ट्र टाइम्स, च्या,"चख दे " या सदरा खाली प्रसिद्ध झाली होती.
27 March 2015
नाचणी सूप (Raagi Soup)
नागली किंवा रागी या नावाने ओळखलं जाणारं हे धान्य गरिबांचं अन्न म्हणून आजवर माहीत होतं, पण या गुणी नाचणीचं महत्त्व हल्ली खूपच जाणवायला लागलं आहे. लोह आणि कॅल्शियम यांनी युक्त असलेली नाचणी मुलांच्या वाढीसाठी अप्रतिम आहे. म्हणूनच नाचणी सत्त्वाची लापशी मुलांना देतात. तसेच मोड आलेल्या नाचणीच्या सेवनामुळे नाचणीतलं नैसर्गिक लोह शरीराला मिळतं आणि बाळंतिणीला दूध येण्यासाठी मदत होते. वजन घटवायचे असेल तर आहारात नाचणीची भाकरी खातात. गहू व ज्वारी ऐवजी. नाचणी ग्लुटेनफ्री आहे, नाचणीला कीड लागत नाही, हा तिचा आणखी एक गुण.आणि अतिशय थंड आहे .उन्हाळ्यात खास याचे अंबिल केले जाते.याचाच थोडा माॅडर्न प्रकार म्हणजे सूप ! कसे केले पहा.
साहित्य :
1) नाचणीचं पीठ, एक टेस्पून
2) आंबट ताक, एक वाटी
3) जिरेपूड, 1/2 टीस्पून
4) काळी मिरपूड, 1/4 टीस्पून
5) गाजर, भोपळी मिरची इ. भाज्यांचे बारीक तुकडे एक वाटी,
6) अक्रोड किवा बदाम काप ऐच्छीक
7) चवीला मीठ,
8) लसणीच्या दोन पाकळ्या बारीक चिरून,
9) तूप एक टीस्पून
10) पाणी 2 वाट्या
11) कोथिंबीर.
कृती :
तूप गरम करून त्यात लसूण परतावी, भाज्या आणि अक्रोडचे बारीक तुकडे घालून परतावे, पाणी घालून उकळत ठेवावं.
ताक आणि नाचणीचं पीठ एकत्र कालवून उकळत्या पाण्यात घालावं आणि शिजेपर्यंत ढवळत राहावं. आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवा .
नंतर मीठ, जिरेपूड, मिरपूड घालून खाली उतरावं, कोथिंबीर घालून गरम प्यायला द्यावं.
कोल्हापूरी कांदा-लसूण चटणी/मसाला(Kolhapuri Chuteny/Masala)
साहीत्य :-
* लाल मिरचीपावडर १ किलो
* बारीक मीठ २५० ग्रँम
* कांदा उभा पातळ चिरून १किलो
* लसूण १००ग्रँम
* आलं १००ग्रँम
* कोथिंबिर १ जूडी निवडून
* गोडा मसाला ५०० ग्रँम
गोडा मसाला कृती या लिंकवर पहा 👇
http://swadanna.blogspot.in/2015/12/goda-masala.html?m=1
कृती :-
प्रथम कांदा तेलावर भाजून घ्या. आलं-लसूण कुटून घ्या. थंड होऊ द्या. कोथिंबिर चिरून घ्या.
आता मिक्सरमधे कांदा,आलं-लसूण व कोथिंबिर थोडे मीठ घालून एकत्र वाटून घ्या.
नंतर मिरचीपावडर व तयार गोडा मसाला एका मोठ्या परातीमधे घ्या. मोठ्या चमच्याने एकत्र करा. त्यामधे वरील वाटलेला मसाला घाला व हाताने सर्व एकत्र मिसळा.
शेवटी परत एकदा सर्व एकत्रित केलेला मसाला थोडा -थोडा मिक्सरमधे फिरवून काढा. म्हणजे व्यवस्थित एकजीव होतो.
आपली झटपट कोल्हापूरी मसाला चटणी तयार!
तयार मसाला स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवा.नुसता सुध्दा तेल घालून भाकरीसोबत खायला छान लागतो.भाजी-आमटीची चव तर अप्रतीम लागते.तुम्हीही नक्की करून बघा !
टीप:
मी वर्षभराच्या हिशेबाने मापे दिलीत. परंतु मिरचीपूड व गोडा मसाला वेगवेगळा तयार असेल तर २-३ महीन्यातून थोडी -थोडी ताजी तयार करा. चव चांगली लागते. मसाले वेगवेगळे ठेवल्याने, ज्यांचे घरी कांदा लसूण सर्वच भाज्यामधे घालत नाहीत त्यानाही सोईचे होते.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
मसाला ताक (Masala Butter milk)
ताकाला 'पृथ्वीवरचे अमृत' असे म्हटलेले आहे.तसेच ताक अतिशय पाचक असते. रोजच्याच जेवणात याचा समावेश असावा.ताकामध्ये दूधातील सर्व घटक असतात.त्यामुळे ज्याना दूध पचत नाही किवा आवडत नाही त्यानी आहारात ताकाचा वापर जरूर करावा.असे हे थंड ,पाचक चवदार ताक नुसतेच प्यायले तरी चालते.पण मसाला घालून केले तर जास्तच चवदार लागते.कसे करायचे पहा.
* पाणी २ कप
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* हिरवी मिरची बिया काढून बारीक चिरून (आवडत असल्यास )
* काळे मीठ गरजेनुसार
* हिंग चिमूटभर
* साखर अर्धा टीस्पून ( गरज वाटली तर )
* कोथिंबीर बारीक चिरून
* पुदीना पाने
आवडीप्रमाणे मिरेपूड,चाट मसाला पण वापरू शकता .
22 March 2015
गाजर बर्फी (Carrot Burfi )
गाजर एक कंदमुळ वर्गीय भाजी आहे.गाजरात जीवनसत्व 'अ' मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यासाठी खूप उपयुक्त आहे.गाजर नुसते तर खाता येतेच,शिवाय त्यापासून खूप पदार्थ केले जातात. चटणी,कोशिंबीर,भाजी,खीर,हलवा, गाजर रोल,कटलेट,सूप ! अशा खूप सार्या पदार्थांची नावे घेता येतील. मी आज गाजराची बर्फी करणार आहे.काय साहीत्य व कशी ते पहा .
साहीत्य :-
1) गाजराचा किस 2 वाट्या
2) ओल्या नारळाचा चव 2 वाट्या
3) साखर 3 वाट्या
4) सायीसह दूध 1 वाटी किवा फ्रेश क्रीम (अमूल) 1/2 वाटी
5) मिल्क पाडर 1टेस्पून
6) वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स आवडीनुसार
7) तूप 1 टेस्पून
कृती :-
प्रथम गाजराचा किस व खोबरे एका पॅनमधे तुपावर थोडे परतावे.
नंतर त्यात दूध / क्रीम घालावे. चांगले शिजू द्यावे.
आता त्यात साखर घाला.सतत हलवत रहा. थोडा गोळा होत आले की मिल्क पावडर घाला. हलवत रहा.गोळा होऊन कडेने सुटत आला की गॅस बंद करा.
नंतर खाली उतरवून वेलची पावडर घाला व तूप लावलेल्या ताटात ओतून थापावे. थापताना आधि वरून ड्राय फ्रूट्स घालावेत. थोडे थंड झाल्यावर चाकूने रेषा मारून ठेवा.व थंड होऊ दे.
आता पूर्ण थंड झाले की वड्या कापून डब्यात भरा.आठ दिवस आरामात फ्रिज शिवाय रहातात.
17 March 2015
कोवळ्या कैरीचे लोणचे(Mango Pickle)
कैरी,चिंच असे नांव निघाले तरी तोंडाला पाणी सुटते. साधारण फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या सुरूवातीला बाजारात कोवळ्या कैर्या (आत अजून कडक कोय तयार नसते) यायला सुरवात होते.मग घरी आणल्या जातात व अनेक प्रकार केले जातात. किसून सरबत , चिरून कधी भेळेवर,जेवणात मीठ,तिखट घालून फोडी. तर मुलं येता नुसत्याच मीठ लावून खातात.तशा आत्ता या कैर्या आंबट नसतात. बरेचवेळा लाल/हीरवी चटणी,चैत्र पाडव्याला अंबेडाळही केली जाते.मी कैर्या घरी आणल्या की, सर्व पदार्थ आलटून पालटून करत असते. आज ताजे-ताजे लोणचे केले.हे लोणचे टिकाऊ नसते.दोन-चार दिवसात खाऊन संपवायचे असते.तसेही लोणचे म्हणले की संपतेच म्हणा ! हे लोणचे मुरायची गरज नसते.केले की लगेच भाज्यांच्या लोणच्या प्रमाणे खाता येते.चला तर कसे करायचे पाहू.
साहीत्य :-
1) कोवळ्या कैर्या 3 नग
2) मोहरी डाळ पाव वाटी
3) गूळ किंवा साखर पाव वाटी
4) मेथी पाव टीस्पून
5) लाल मिरची पूड 2 टीस्पून
6) हळद 1/2 टीस्पून
7) मीठ 3- 4 टी स्पून
8) हीग मोहरी फोडणीसाठी
9) तेल पाव वाटी फोडणीसाठी
10) पाणी अर्धी वाटी
कृती :-
प्रथम कैर्या स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या.थोड्या बारिकच चौकोनी फोडी करून घ्या.
आता या फोडीवर मीठ ,हळद व गूळ चिरून घाला व हलवून थोडावेळ ठेवा.म्हणजे रस सुटतो.
नंतर मोहरीची डाळ कुटून त्यामध्ये पाणी घालून नाकाला झिणझिण्या येईपर्यंत घुसळा (ही क्रिया मिक्सर मधे केली तरी चालते). घुसळलेली डाळ फोडीवर घाला. तसेच मेथी पण पळीमधे तांबूस तळून कुटून फोडींवर घाला. मिरची पूड निम्मी घाला.सर्व नीट हलवा.
नंतर मेथी तळलेल्या पळीतच हींग,मोहरी हळद घालून फोडणी करा.गॅस बंद करा.थोडासा गरमपणा कमी झाला फोडणीचा की शिल्लक मिरची पूड घालावी. आता फोडणी पुर्ण थंड होऊ द्यावी.
आता वरील फोडीवर थंड फोडणी घाला व परत नीट हलवा.मस्त आंबट-गोड चवीचे ताजे झटपट लोणचे तयार ! जेवणाची रंगत तर वाढतेच व पोहे ,उपमा, पराठे,पुर्या कशाही सोबत खाता येते.
सुटले न तोंडाला पाणी ? चला तर बघू आजच्या जेवणात झटपट करून टाका ! आणि हो कसे झाले ते सांगायला विसरू नका.
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा.
16 March 2015
कायरस-पंचामृत (Kayras-Panchamrut)
कायरस हा पदार्थ तसा पारंपारीक आहे . साधारण फेब्रूवारीच्या अखेरीस कोवळ्या कच्या कैर्या यायला सुरवात होते.तेव्हापासून ते जून परेंत आमच्याकडे हा आंबट-गोड चविचा पदार्थ अधून-मधून चालूच असतो सर्वानाच आवडतो.यालाच पंचामृत असेही म्हणतात.कायरस किंवा पंचामृत कैरी प्रमाणेच कवठ,पेरू,राय आवळे तसेच चिंच यापासून पण करतात.आज मी कैरीचा कायरस कसा केला ते पहा....
साहीत्य :-
1) कच्ची कैरी मध्यम आकाराची एक
2) चिरलेला गूळ पाव वाटी(कैरीच्या आंबटपणा नुसार कमी-जास्त घ्यावा) टीप पहा
3) भाजलेल्या तिळाचे कूट 1 टेस्पून
4) भाजलेल्या दाण्याचे कूट 2 टेस्पून
5) लाल सुकी मिरची तूकडे 7-8
6) कडीपत्ता,कोथंबिर
7) सुके खोबर्याचा किस 1टेस्पून
8) मेथी दाणे 7-8
9) हिंग,जिरे,मोहरी हळद फोडणीसाठी
10) तेल 1 टेस्पून
11) मीठ चवीनुसार
12) धणा-जिरा पावडर किंवा गोडा मसाला 1 टीस्पून
13) पाणी गरजेनुसार
कृती:-
प्रथम कैरीची साल काढून पातळ चपट्या अशा साधारण एक-दीड इंचाच्या रूंद फोडी करून घ्याव्यात.
नंतर पातेल्यात तेल घालून, मेथी ,हींग ,मोहरी जिर्या ची फोडणी करा . त्यात हळद मिरची व कडीपत्ता टाकून परता व कैरीच्या फोडी त्यावर टाकाव्यात व परतून थोडेच पाणी घाला. झाकणी घालून थोडी वाफ आणावी.
फोडी मऊ होतील इतपत.
आता फोडी मऊ झाल्या असतील तर त्यामध्ये बाकीचे मीठ गूळ,मसाला घालून थोडे पाणी घालावे.उकळी आली की दाण्याचे,तिळाचे कूट खोबरे कूटून घालावे. गरज वाटली तर अजून थोडे पाणी घाला. कायरस रायत्या सारखा घट्टसरच असतो. पण जर का आवडत असेल तर थोडा वरणा सारखा पातळ करावा.म्हणजे भाता सोबत पण खाता येतो.एक उकळी आणा व गॅस बंद करा.वरून कोथंबिर घाला. कायरस तयार!
असा हा आंबट-गोड चवीचा कायरस चपाती किवा भात कशासोबतही छान लागतो.
बर्याच वेळा त्याच त्या भाज्या खावून कंटाळा येतो किंवा सूकी भाजी असते व अजून एखादी ग्रेव्हीसब्जी काय करावी असा प्रश्न असतो तेव्हा करून बघायला हरकत नाही.
टीप :- जर कैरी कोवळी असेल व आंबट नसेल तर गूळ कमी लागतो . कैरीच्या आंबटपणा नुसार घ्यावा.






