कच्छी दाबेली हा एक रोडसाईड स्नँक्सचा प्रकार आहे. फारसा तेलकट किंवा खूप तिखट, मसालेदार नसतो. त्यामुळे खाताना फारशी काळजी नाही. तसेच चटण्या व सारण तयार असेल तर अजिबात वेळ लागत नाही. कसे करायची साहित्य व कृती-👇
साहित्य
* पावभाजीचे पाव
* ऊकङलेले बटाटे
* बारीक शेव
* ङाळींबाचे दाणे
* मसाला शेगदाणे
* कांदा ,कोथिंबीर , लिंबू
* आलं-लसूण पेस्ट
* दाबेली मसाला,
* मीठ,साखर
* तेल
* बटर
* गोङ चटणी (चिंच खजूराची)
* तिखट चटणी (काश्मिरी लाल मिरची,लसूण मीठ घालून वाटलेली) किंवा शेजवान चटणी अथवा हिरवी पुदीना चटणी
कृती:-
प्रथम पॅनमधे थोङे तेल घालून गरम तेलात आलं-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे.
नंतर दाबेलीमसाला ,चविनुसार मीठ, साखर घालावे व लिंबू पिळावे शेवटी मॅश केलेला बटाटा घालून थोङे परतावे.
नंतर कांदा पॅन गॅसवरून खाली घेऊन त्यात मसाला शेंगदाणे,ङाळींब दाणे,बारीक चिरलेला कांदा,बारीक शेव घालून चांगले मिक्स करावे व सारण तयार करावे.
पाव घेऊन मधे दोन बाजूनी(तीन नको) कापावा व दोन्ही तिखट व गोङ चटणी आतल्या बाजूस लावून घ्याव्यात,त्यावर वरचे तयार सारण भरावे.आणि पाव दाबून बंद करावा.
बंद मसाला पाव तव्यावर बटर घालून थोङा उलट-सुलट भाजावा व सर्व्हींग ङिश मधे काढावा व त्यावर आवङीनूसार शेव,कांदा व ङाळींब दाणे,मसाला शेंगदाणे घालावे व सर्व्ह करावे.
याप्रमाणेच बटाच्याऐवजी वाफवलेले रताळे वापरून पण दाबेली बनविता येते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.